अल्ला हो अकबरच्या घोषणा देत जमावाकडून तरुणाची निर्दयी हत्या, न्यायालयाने चार आरोपींविरुध्द खून आणि दंगलीचा आरोप केला निश्चित


नवी दिल्ली येथे गेल्या वर्षी झालेल्या दंगलीप्रकरणी चार आरोपींवर दिल्ली न्यायालयाने खून, दंगल आणि गुन्हेगारी कट रचण्याचे आरोप निश्चित केले. अल्ला हो अकबरच्या घोषणा देत सशस्त्र मुस्लिम जमावाने तरुणाची निर्दयपणे हत्या केल्याचे स्पष्ट झाले असून हा पूर्वनियोजित हल्ला होता असे न्यायालयाने म्हटले आहे.Mob brutally kills youth, court charges four accused of murder and riot


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : नवी दिल्ली येथे गेल्या वर्षी झालेल्या दंगलीप्रकरणी चार आरोपींवर दिल्ली न्यायालयाने खून, दंगल आणि गुन्हेगारी कट रचण्याचे आरोप निश्चित केले. अल्ला हो अकबरच्या घोषणा देत सशस्त्र मुस्लिम जमावाने तरुणाची निर्दयपणे हत्या केल्याचे स्पष्ट झाले असून हा पूर्वनियोजित हल्ला होता असे न्यायालयाने म्हटले आहे.

अन्वर हुसैन, कासिम, शाहरुख आणि खालिद अन्सारी या चौघांवर 25 फेब्रुवारी 2020 रोजी आंबेडकर महाविद्यालयाजवळ दीपक नावाच्या तरुणाला निर्दयीपणे मारहाण केल्याचा आरोप आहे.


Delhi Violence : दिल्ली हिंसाचारात मोठा खुलासा, खलिस्तानी ट्विटर हँडलवरून हिंसाचाराचा कट


शवविच्छेदनानुसार त्याचा मृत्यू रक्तस्रावामुळे झाला आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश अमिताभ रावत म्हणाले की, या खटल्यातील एक प्रमुख साक्षीदार नाल्याच्या मागे भिंतीच्या मागे लपला होता. त्याने भिंतीच्या आडून संपूर्ण खून पाहिला. जमावाच्या वर्तणुकीवरून त्यांच्या एकत्रीकरणाच्या पद्धतीनुसार दंगल घडविणे हाच त्यांचा हेतू होता. या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा साक्षीदार सुनील कुमार होता. सशस्त्र मुस्लिम जमावाने तरुणाची हत्या कशी केली याचे संपूर्ण चित्र त्याने न्यायालयासमोर उभे केले आहे.

न्यायालयाने म्हटले आहे की, सुनीलने पाहिले होते की 25 फेब्रुवारी रोजी कर्दमपुरी पुलिया येथून एक मुस्लिम जमाव येत होता. अल्ला हो अकबर अशी घोषणा देत पुलिया गोकुलपूर पार करण्याचा प्रयत्न करत होता. या सशस्त्र जमावाने दीपकला पकडले आणि त्याला निर्दयीपणे मारहाण करण्यात आली. यावेळी सुनीलकुमार नाल्याच्या मागे एका भिंतीच्या मागे लपला होता. त्याने तेथून संपूर्ण खून पाहिला होता. प्रत्यक्षदशीर्ने चारही आरोपींना त्यांच्या नावावरून ओळखले.

न्यायालयाने कलम १४७ (दंगल), १४८ (दंगल, प्राणघातक शस्त्राने सशस्त्र), ३०२ (हत्या), कलम १४९ (बेकायदेशीर सभा) आणि १२०बी (गुन्हेगारी कट) नुसार आरोप निश्चित केले. .

Mob brutally kills youth, court charges four accused of murder and riot

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात