Delhi Violence : दिल्ली हिंसाचारात मोठा खुलासा, खलिस्तानी ट्विटर हँडलवरून हिंसाचाराचा कट

Delhi Violence: Big revelation in Delhi violence, plot of violence from Khalistani Twitter handle

26 जानेवारी रोजी झालेल्या शेतकरी ट्रॅक्टर रॅलीदरम्यान राजधानी दिल्लीतील हिंसाचाराविषयी मोठा खुलासा झाला आहे. या हिंसाचारात खलिस्तानी संघटनेचा हात असल्याचे पुरावे दिल्ली पोलिसांच्या हाती लागले आहेत. खलिस्तानी ट्विटर हँडलद्वारे हिंसाचाराचे कट रचल्याचे सांगण्यात येत आहे. हिंसाचारानंतर सर्व खलिस्तानी ट्विटर हँडल्स दिल्ली पोलिसांच्या रडारवर आले आहेत. Delhi Violence: Big revelation in Delhi violence, plot of violence from Khalistani Twitter handle 


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : 26 जानेवारी रोजी झालेल्या शेतकरी ट्रॅक्टर रॅलीदरम्यान राजधानी दिल्लीतील हिंसाचाराविषयी मोठा खुलासा झाला आहे. या हिंसाचारात खलिस्तानी संघटनेचा हात असल्याचे पुरावे दिल्ली पोलिसांच्या हाती लागले आहेत. खलिस्तानी ट्विटर हँडलद्वारे हिंसाचाराचे कट रचल्याचे सांगण्यात येत आहे. हिंसाचारानंतर सर्व खलिस्तानी ट्विटर हँडल्स दिल्ली पोलिसांच्या रडारवर आले आहेत.



मीडिया रिपोर्ट्सनुसार, सर्व खलिस्तानी ट्विटर हँडलची ओळख पटवली जात आहे. त्यावरील कंटेंटचाही तपास होत आहे. एवढेच नाही, तर हे ट्विटर हँडल कोठे, कधी व कोणी तयार केले? दिल्ली पोलिसांनीही सर्व तपशिलांचा शोध सुरू केला आहे. या खलिस्तानी ट्विटर हँडलवरून हिंसाचाराबद्दल अनेक चिथावणीखोर ट्वीट करण्यात आले आहेत.

Delhi Violence: Big revelation in Delhi violence, plot of violence from Khalistani Twitter handle

तत्पूर्वी ट्विटरने हिंसाचाराच्या दुसर्‍याच दिवशी 550 ट्विटर अकाउंट निलंबित केले होते. ट्विटरने म्हटले की, हिंसा, अश्लीलता आणि चिथावणी देण्याच्या नियमांचे उल्लंघन केल्यावर अशा ट्विटर हँडलवर कठोर कारवाई करण्यात आली आहे. ट्विटरने म्हटले आहे की, आम्ही परिस्थितीवर बारीक नजर ठेवून आहोत आणि त्यांचे परीक्षण करत आहोत. सिंथेटिक अँड मॅनिप्युलेटेड मीडिया पॉलिसीचे उल्लंघन करणाऱ्या ट्वीटबाबत जे आम्हाला रिपोर्ट करतात, त्यांना जास्त प्रोत्साहन देत आहोत.

Delhi Violence: Big revelation in Delhi violence, plot of violence from Khalistani Twitter handle

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती