ममता बॅनर्जी 1 जूनच्या ‘इंडी’ आघाडीच्या बैठकीत सहभागी होणार नाहीत!

Mamata Banerjee will not participate in the Indi Front meeting on June 1

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी इंडी आघाडीच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे. Mamata Banerjee will not participate in the Indi Front meeting on June 1

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली: I.N.D.I.A आघाडीची बैठक १ जून रोजी होणार आहे. तृणमूल काँग्रेसच्या सुप्रीमो आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या बैठकीला उपस्थित राहणार नसल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आता ममता बॅनर्जी यांनीच या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

एका सभेला संबोधित करताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, इंडिया ब्लॉकने आधी सांगितले होते की ते 1 जून रोजी बैठक करणार आहेत. तेव्हा त्या म्हणाल्या होत्या की, ‘त्या या बैठकीला उपस्थित राहू शकत नाही. याचे कारण म्हणजे अजूनही बंगालमध्ये काही ठिकाणी निवडणुका होणे बाकी आहे. एकीकडे मी चक्रीवादळ आणि मदत केंद्राला भेटीही देत आहे. दुसरीकडे निवडणुका सुरू आहेत, मी त्यांचा बंदोबस्त करत आहे. अशा परिस्थितीत मी बैठकीला कसे उपस्थित राहू? जनतेला दिलासा देणे हे त्यांचे प्राधान्य आहे आणि त्यांची सहानुभूती पीडित लोकांसोबत आहे. असं त्यांनी सांगितलं आहे.



तत्पूर्वी, सूत्रांच्या हवाल्याने असे वृत्त दिले जात होते की तृणमूल काँग्रेस (TMC) 1 जून रोजी होणाऱ्या इंडिया ब्लॉक बैठकीत सहभागी होण्याची शक्यता नाही. याचे कारण म्हणजे सध्याच्या लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदानाच्या दिवशी ही सभा होत आहे. यावेळी ममता यांच्या वक्तव्याने त्याला आणखी बळ मिळाले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी 1 जून रोजी दुपारी I.N.D.I.A आघाडीच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, 1 जून रोजी पश्चिम बंगालमध्ये नऊ जागांसाठी मतदान होणार आहे. यामध्ये कोलकाता, कोलकाता दक्षिण आणि कोलकाता उत्तर या दोन जागांचा समावेश आहे. टीएमसीसाठी हे खूप महत्त्वाचे आहे. सभेच्या दिवशी पश्चिम बंगालमध्ये अनेक ठिकाणी मतदान होणार आहे. या जागा जादवपूर, दम दम, बारासत, बसीरहाट, जयनगर, मथुरापूर, डायमंड हार्बर, कोलकाता दक्षिण आणि कोलकाता आहेत.

Mamata Banerjee will not participate in the Indi Front meeting on June 1

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात