अमित शाहांनी केला विरोधी पक्षांच्या जागांबाबत मोठा दावा, म्हणाले…

भाजपने 5 टप्प्यात 310 जागांचा आकडा पार केला आहे, असंही अमित शाह यांनी म्हटलेलं आहे. Amit Shah made a big claim about the seats of the opposition parties

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांनी लोकसभा निवडणुकीसाठी उत्तर प्रदेशातील कुशीनगर येथे जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी दावा केला की, राहुल गांधींचा पक्ष 40 चा आकडाही पार करू शकणार नाही. यादरम्यान अमित शाहा म्हणाले, अखिलेश यादव यांच्या सपा पक्षाला यूपीमध्ये 4 जागाही मिळवता येणार नाहीत.

अमित शहा म्हणाले, सहा टप्प्यातील मतदान संपले आहे. पाच टप्प्यांची आकडेवारी समोर आली आहे. भाजपने 5 टप्प्यात 310 जागांचा आकडा पार केला आहे. सहावा टप्पा पूर्ण झाला आहे. सातवा टप्पा असणार आहे. आता तुम्हाला 400 चा आकडा पार करावा लागेल, असे आवाहन त्यांनी जनतेला केले.



4 जूनला पंतप्रधान मोदींचा विजय निश्चित असल्याचं शाहांचं म्हणणं आहे. भाजप आणि एनडीएचा विजय निश्चित आहे. शाह म्हणाले, 4 जूनला दुपारी राहुलबाबांचे लोक पत्रकार परिषद घेणार आहेत हे बघा. यानंतर ते म्हणू लागतील की ईव्हीएममुळे आमचा पराभव झाला. पराभवाचे खापर खर्गे साहेबांवरच पडणार आहे. तसेच, ते म्हणाले मला आज मायावती आणि अखिलेश यादव यांना विचारायचे आहे. कुशीनगर हे ‘शुगर बाऊल’ या नावाने प्रसिद्ध होते. पण तुमच्या काळात 5-6 साखर कारखाने बंद पडले आहेत. आमच्या सरकारच्या काळात 20 साखर कारखाने सुरू करण्याचे काम झाले.

Amit Shah made a big claim about the seats of the opposition parties

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात