I.N.D.I.A आघाडीच्या पहिल्याच समन्वय बैठकीआधी ममतांनी दुबईतून सोडली नेतृत्वाची राजकीय पुडी; धरली श्रीलंकन अध्यक्षांच्या “आधाराची काडी”!!


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : I.N.D.I.A आघाडीच्या तीन व्यापक बैठका झाल्यानंतर आज पहिल्यांदाच राजधानी नवी दिल्लीत शरद पवारांच्या 6, जनपथ या निवासस्थानी आघाडीच्या समन्वय समितीची पहिली बैठक होत आहे. मात्र, या पहिल्या बैठकीपूर्वीच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी दुबईतून I.N.D.I.A आघाडीच्या नेतृत्वाची राजकीय पुडी सोडली आहे आणि त्यासाठी श्रीलंकन अध्यक्षांच्या आधाराची काडी धरली आहे!! Mamata banerjee creates confusion over leadership of I.N.D.I.A from Dubai

ममतांना म्हणे दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या व्हीव्हीआयपी लॉबीत श्रीलंकेचे अध्यक्ष रानील विक्रमसिंघे यांनी पाहिले आणि त्यांना चर्चेसाठी बोलाविले. तेथे त्यांनी ममतांना I.N.D.I.A आघाडीचे नेतृत्व तुम्ही करणार का??, असे विचारले. त्यावर ममतांनी जनतेने पाठिंबा दिला, तर आम्ही सत्तेवर येऊ असे हसून उत्तर दिले. ही सर्व माहिती स्वतः रानील विक्रमसिंघे यांनी दिली नाही, तर ममता बॅनर्जींनी आपल्या ट्विटर अकाउंट वर लिहिली आहे. त्यामुळे रानील विक्रमसिंघे यांनी खरंच ममता बॅनर्जी यांना I.N.D.I.A आघाडीचे नेतृत्व करणार की नाही असे विचारले का?? की ममतांनीच दुबईतून ही राजकीय पुडी सोडून दिली??, हा सवाल तयार झाला आहे.

ममतांनी रानील विक्रमसिंघे यांच्याशी झालेल्या भेटीचे ट्विट केले. त्यांनी विक्रमसिंघे यांना कोलकत्ता इंटरनॅशनल इन्व्हेस्टमेंट मीट साठी निमंत्रण दिले. ते त्यांनी स्वीकारले. याविषयी ममतांनी श्रीलंकेच्या अध्यक्षांचे आभार मानले. ही सर्व माहिती ममतांनी आपल्या ट्विटर हँडलवर दिली. पण ही माहिती देण्याचा राजकीय मुहूर्त देखील त्यांनी आजच्या I.N.D.I.A आघाडीच्या पहिल्या समन्वय बैठकीचा निवडला.

या समन्वय बैठकीत शरद पवारांच्या मार्गदर्शनाखाली आघाडीतले घटक पक्ष लोकसभा जागा वाटपाचा चर्चा करणार आहेत. पण नेमकी त्याच वेळेस ममतांनी आघाडीच्या नेतृत्वाची पुडी सोडून फाऊल केला आहे का??,असा कळीचा सवाल तयार झाला आहे.

कारण एकीकडे आम आदमी पार्टी I.N.D.I.A आघाडीच्या बैठकीत सामील होते, तर दुसरीकडे प्रत्येक राज्यात स्वतंत्रपणे निवडणुकीची तयारी करते. त्यामुळे आधीच समन्वय बैठकीत जागा वाटपात घोळ सुरू होण्याची शक्यता आहे. त्यात ममतांनी दुबईतून राजकीय पुडी सोडल्याने त्या घोळात घोळात घोळ होणार आहे. त्यामुळे पहिल्याच समन्वय बैठकीत खरंच नेमके काय घडेल आणि शरद पवार त्या बैठकीला नेमके काय मार्गदर्शन करतील??, याची उत्सुकता आघाडीतल्याच नेत्यांना लागली आहे.

Mamata banerjee creates confusion over leadership of I.N.D.I.A from Dubai

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात