विशेष प्रतिनिधी
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्याच्या आणि न पडल्याच्या पार्श्वभूमीवर पवारांच्या घरातल्या नेत्यांवर दोन्ही गटाचे नेते बोलण्याचे आतापर्यंत टाळत होते, पण आता अजितनिष्ठ गटाने खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वावर प्रथमच थेट हल्लाबोल केला आहे. किंबहुना त्यांच्या नेतृत्व क्षमतेची उणीवच अजितनिष्ठ गटाने नेमक्या शब्दांत काढली आहे. Ajit pawar faction for the first time directly targets supriya sule over her leadership abilities
सुप्रियाताई, तुम्हाला सर्वोत्कृष्ट संसदपटू म्हणून अनेकदा पुरस्कार मिळाला. इतकी वर्षे आपण खासदार होतात. वर्षातले 180 दिवस आपण दिल्लीत असायचा, पण एवढे असूनही दिल्लीत साधा एक नगरसेवकही आपल्याला का निवडून आणता आला नाही??, असा बोचरा सवाल अजितनिष्ठ गटाचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी केला.
शरद पवारांच्या नावाभोवती फार मोठे वलय आहे. पण महाराष्ट्राबाहेर कुठे एक-दोन खासदार निवडून आले. दोन-चार आमदार निवडून आले. या पलीकडे राष्ट्रवादी काँग्रेसची कुठे प्रगती झाली नाही. याची जबाबदारी कोण घेणार?? आपला दिल्लीत प्रभाव आहे. आपण देशभर फिरला असतात, तर राष्ट्रवादी काही प्रमाणात तरी वाढली असती. पण त्याऐवजी आपण महाराष्ट्रात फिरत राहिलात. महाराष्ट्रात अजितदादा पुरेसे होते. ते पक्ष संघटना वाढवतही होते.
सुप्रिया सुळेंच्या सुरात प्रकाश आंबेडकरांचा सूर; मोदींना दिले 70000 कोटींच्या भ्रष्टाचाराबद्दल पवारांवर गुन्हे दाखल करण्याचे आव्हान!!
पण त्यांच्या कामात अडथळे आणले गेले, असा थेट हल्लाबोल उमेश पाटील यांनी केला. पक्षाचे नेतृत्व कुवत नसलेल्या माणसाच्या हातात देण्याचा प्रयत्न झाल्यावर पक्ष बुडणार हे निश्चित होते तसे झाले तर त्याची जबाबदारी कोण घेणार?? प्रफुल्ल पटेल आत्तापर्यंत शरद पवारांची सावली म्हणून वावरले. छगन भुजबळांनीही पवारांना साथ दिली पण त्यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांवर निर्णय घेण्याची वेळ का आली आणि ती कोणी आणली, याचा विचार करायला नको का??, असा परखड सवालही उमेश पाटील यांनी केला.
अजितदादांची कोंडी करण्यासाठी महाराष्ट्रात आपले फॉलोवर्स वाढवायचे असले उद्योग केले. सुप्रिया सुळेंनी देशपातळीवर लक्ष घातले असते आणि अजित पवारांनी महाराष्ट्रात लक्ष घालू दिले असते, तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बिलकुल अडचण आली नसती. पण तसे झाले नाही. उलट अजित पवारांची कोंडी करून त्यांच्या अडचणी वाढवण्याचा प्रयत्न झाला, अशा शब्दांत उमेश पाटलांनी सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्व क्षमतेच्या वर्मावर बोट ठेवले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more