विशेष प्रतिनिधी
मुंबई / नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर शरद पवारांच्या बाजूने एक सुरात बोलले. या दोन्ही नेत्यांनी वेगवेगळ्या भाषेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना आव्हान दिले, पण त्यातला विषय मात्र एकच होता आणि तो विषय 70000 कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा होता. Prakash Ambedkar’s tune in the tune of Supriya Sule
काल लोकसभेत बोलताना सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला नॅचरल करप्ट पार्टी असे म्हणता. आमच्या पक्षावर भ्रष्टाचाराचे आरोप करता पण आमच्याच पक्षाला महाराष्ट्रात सत्तेमध्ये घेता याविषयी क्लासिफिकेशन द्या, असे आव्हान भाजपला दिले होते.
आज वेगळ्या भाषेत प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत तेच आव्हान पंतप्रधान नरेंद्र मोदींना उद्देशून दिले. 70000 कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराबद्दल शरद पवारांवर आणि बाकीच्या गुन्हेगारांवर खटले दाखल करा, नाहीतर पवारांची माफी मागा. येत्या 10 दिवसांत हे केले नाही, तर वंचित बहुजन आघाडी मोदी सरकार विरुद्ध जोरदार आंदोलन करेल, असा इशारा प्रकाश आंबेडकरांनी दिला. वंचित बहुजन आघाडीच्या या आंदोलनात काँग्रेस राष्ट्रवादीने सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले
एरवी प्रकाश आंबेडकर आणि शरद पवार यांचे राजकीय नाते साप – मुंगसाचे आहे. महाविकास आघाडीत वंचित बहुजन आघाडीला समाविष्ट करण्यास पवारांचा आक्षेप असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकरांनी काही दिवसांपूर्वी केला होता. पण आता याच प्रकाश आंबेडकरांनी पवारांच्या बाजूने उभे राहून मोदींना त्यांनीच केलेल्या 70000 कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराबद्दल खटले दाखल करण्याचे आव्हान दिले. इतकेच काय पण कालच सुप्रिया सुळे यांनी वेगळ्या भाषेत भाजपला तेच आव्हान दिले होते. ही यातली सर्वात मोठी राजकीय विसंगती आहे.
प्रकाश आंबेडकर म्हणाले :
मध्य प्रदेशातील भोपाळ येथे भाजपच्या बूथ कार्यकर्त्यांच्या बैठकीत पंतप्रधानांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्यावर सिंचन घोटाळा, सहकारी बँक घोटाळा आणि बेकायदेशीर खाण घोटाळा यासह अनेक घोटाळ्यांचे आरोप केले होते. आता 70000७० कोटींच्या घोटाळ्यात नरेंद्र मोदींनी गुन्हे दाखल करावेत किंवा शरद पवारांची माफी मागावी. असं न केल्यास आम्ही आंदोलन करू.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं भाषण वृत्तवाहिन्यांवर प्रसारित करण्यात आलं, इलेक्ट्रॉनिक टेलिव्हिजन चॅनेलवर अनेकवेळा ते वृत्त दाखवण्यात आलं. सोशल मीडियावर त्याचे पडसाद उमटले. जर देशाचे पंतप्रधान असे आरोप जाहीरपणे करत असतील, तर ते ठोस माहिती आणि पुराव्यांवरून येत असावेत, जे त्यांनी त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या ED, CBI, इन्कम टॅक्स या एजन्सींच्या माध्यमातून खात्री केले असावेत. म्हणून, आम्ही पंतप्रधानांना विनंती करतो की त्यांनी 10 दिवसांच्या आत भ्रष्टाचारात गुंतलेल्या व्यक्तीवर फौजदारी खटले दाखल करावेत आणि 70000 कोटींचा समावेश असलेल्या या आरोपांसाठी पुनर्प्राप्ती प्रक्रिया सुरू करावी.
निवडणुकीतील फायद्यासाठी ठोस पुराव्याशिवाय वरिष्ठ नेतृत्वाची बदनामी करणे नैतिकतेला धरून नाही आणि राजकारणात ते केले जाऊ नये. एकतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आरोप सिद्ध करावेत किंवा शरद पवार यांची बदनामी केल्याबद्दल त्यांची माफी मागावी. 10 दिवसांत पंतप्रधानांनी माफी न मागितल्यास तीव्र आंदोलन करू.
शरद पवार हे I.N.D.I.A. चा भाग आहेत. त्यामुळे आम्ही काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांना आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करतो.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App