विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : देशातल्या सर्व मोदींना चोर ठरविल्याबद्दल राहुल गांधींना सुरत कोर्टाने आणि गुजरात हायकोर्टाने दिलेली दोन वर्षांची शिक्षा सुप्रीम कोर्टाने स्थगित केली. त्यामुळे त्यांची खासदारकी बहाल होण्याची चिन्हे निर्माण झाली. या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये प्रचंड उत्साह संचारला आहे. या उत्साहात काँग्रेस नेत्यांनी खूप मोठ्या आशा आकांक्षा बाळगत विरोधकांमध्ये जोरदार हवा भरण्याची तयारी केली, पण या हवेला बाकीच्या विरोधकांनी टाचणी लावली आहे. Excitement in Congress due to suspension of Rahul Gandhi’s sentence
कारण विरोधी “इंडिया” आघाडीची मुंबईत होणारी बैठक पुढे ढकलावी लागली आहे. नियोजित वेळेनुसार 25 – 26 ऑगस्ट रोजी मुंबईत “इंडिया” आघाडीची बैठक होणार होती. पण आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह आघाडीतले काही नेते त्या दोन दिवसांमध्ये उपलब्ध होणार नसल्याने ही बैठक आता 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर या दोन दिवसांमध्ये होणार असल्याची चिन्हे आहेत.
राहुल गांधींची शिक्षा रद्द नव्हे, फक्त स्थगिती तरीही उत्साहाच्या भरात वडेट्टीवारांनी मध्ये आणली सावरकरांची कथित “माफी”!!
राहुल गांधींच्या शिक्षेला स्थगितीनंतर काँग्रेस नेत्यांमध्ये उत्साह संचारल्याच्या पार्श्वभूमीवर “इंडिया” आघाडीची बैठक पुढे ढकलावी लागल्याने काँग्रेसच्या उत्साहावर पाणी फेरले आहे.
शरद पवार 16 ऑगस्ट पासून महाराष्ट्रव्यापी दौऱ्याला प्रारंभ करणार असल्याचे बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर ते 25 – 26 ऑगस्ट या दोन तारखांना “इंडिया” आघाडीच्या बैठकीसाठी उपलब्ध होऊ शकणार नाहीत. त्यांच्याबरोबर बाकीच्या काही नेत्यांनी आपले नियोजित कार्यक्रम असल्याने बैठकीला उपस्थित राहता येणार नसल्याचे कळविले आहे. त्यामुळे “इंडिया” आघाडीची बैठक पुढे ढकलावी लागली आहे.
– समन्वय समिती लटकली
मुंबईतल्या बैठकीत आघाडीतल्या 11 नेत्यांची एक समन्वय समिती गठित करण्याचा मानस आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी या समन्वय समितीसाठी विशेषत्वाने आग्रह धरला आहे. पण आता “इंडिया” आघाडीची बैठकच पुढे ढकलले गेल्याने ही समिती कशा प्रकारे अस्तित्वात येणार आणि त्या समितीच्या कामासाठी कोणत्या नेत्यांना वेळ मिळणार??, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App