नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आजच्या राजस्थान दौऱ्याच्या वेळी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांची “खुसपटी कॉपी” करत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रोटोकॉलची कुरापत काढली.Ashok gehlot copied supriya sule over PM Modi program protocol drama!!
पंतप्रधानांच्या आजच्या कार्यक्रमातून आपले भाषण वगळल्याचा कांगावा अशोक गेहलोत यांनी केला. पण प्रत्यक्षात तो पंतप्रधान कार्यालयाने लगेच “एक्सपोज” करून टाकला. अशोक गेहलोत यांच्या या कुरापतीमुळे पंतप्रधान मोदींच्या महाराष्ट्रातील देहूच्या दौऱ्याची आठवण ताजी झाली.
सुप्रिया सुळे यांचा कांगावा
महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देहूतील शिळा मंदिराचे उद्घाटन झाले होते. या उद्घाटन कार्यक्रमात तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार हजर होते. परंतु त्यांना पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमात भाषण करून दिले नाही, असा कांगावा नंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी केला होता. अजित पवार हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत. नंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत आणि नंतर ते माझे बंधू आहेत. बाय दॅट ऑर्डर, प्रोटोकॉल नुसार अजित पवारांचा पंतप्रधानांच्या कार्यक्रमात भाषण करायचा हक्क होता. पण तो मुद्दामून नाकारण्यात आला, असा कांगावा सुप्रिया सुळे यांनी केला होता.
सुप्रिया सुळे यांचा कांगावा एक्सपोज
मात्र त्याच वेळी त्यातली वास्तविकता समोर आली होती. कारण त्या कार्यक्रमातील व्हिडिओज युट्युब वर लगेच उपलब्ध झाले होते. पंतप्रधानांनी त्या कार्यक्रमात भाषण सुरू करण्यापूर्वी अजित पवार भाषण करणार नाहीत का?, असे विचारून त्यांना भाषण करण्याची सूचना केली होती. परंतु अजित पवारांनीच मी बोलत नाही. आपणच बोला असे पंतप्रधानांना सूचित केल्यानंतर पंतप्रधान बोलायला उभे राहिले होते. तिथे हजर असलेल्या हजारो वारकऱ्यांनी तो क्षण टिपला होता. तरी देखील सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांना पंतप्रधानांच्या कार्यक्रमात भाषण करू दिले नाही असा कांगावा केला होता. पण तो त्याचवेळी “एक्स्पोज” झाला होता!!
अशोक गेहलोत यांचा कांगावा
पंतप्रधानांच्या आजच्या राजस्थान मधल्या कार्यक्रमाच्या वेळी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी खासदार सुप्रिया सुळे यांची खुसपट काढणारी कॉपी मारायचा प्रयत्न केला. आपल्याला पंतप्रधानांच्या कार्यक्रमात बोलू दिले जाणार नाही. आपले 3 मिनिटांचे भाषण कार्यक्रमातून वगळले आहे म्हणून आपण ट्विटरवरूनच पंतप्रधानांचे स्वागत करतो, असे खोचक ट्विट अशोक गेहलोत यांनी केले.
पण पंतप्रधान कार्यालयाने ताबडतोब त्या ट्वीटला उत्तर देत अशोक गेहलोत यांना पुरते “एक्स्पोज” करून टाकले. पंतप्रधानांच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला रीतसर निमंत्रण दिले आहे. तुमच्या भाषणाचा त्यात स्लॉट देखील ठेवला आहे. पण तुमच्याच कार्यालयाने तुम्ही येऊ शकणार नाही, असे कळविले. आपण जर स्वस्थ असाल, प्रकृती बरी असेल तर आपण कार्यक्रमाला येऊ शकालत तर आम्हाला आनंदच आहे, असे प्रत्युत्तर देणारे ट्विट पंतप्रधान कार्यालयाने करून अशोक गेहलोत यांची सुप्रिया सुळे स्टाईलची कुरापत एक्सपोज करून टाकली.
पण यानिमित्ताने पंतप्रधानांच्या कार्यक्रम जर विरोधी पक्ष शासित राज्यांमध्ये असेल, तर तिथले राज्यकर्ते किंवा प्रभावी नेते कशा कुरापती काढतात याचे दुसरे उदाहरण सुप्रिया सुळे यांच्या नंतर अशोक गेहलोत यांच्या रूपाने आज पुढे आले. पण PMO ने पुरते “एक्सपोज” करून टाकले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App