‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी’ योजनेच्या १४ व्या हप्त्याचा राज्यातील ८५.६६ लाख पात्र शेतकऱ्यांना लाभ – मुख्यमंत्री शिंदे


पंतप्रधानन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘पीएम किसान’ योजनेच्या चौदाव्या हप्त्याचे वितरण करण्यात आले.

विशेष प्रतिनिधी

मुंबई :  राजस्थानच्या सीकर येथे आज पंतप्रधानन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम किसान योजनेच्या चौदाव्या हप्त्याचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांनी ‘वर्षा’ निवासस्थानी उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधला. Chief Minister Shinde interacted with farmers assured that the government is with him

 प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या १४ व्या हप्त्याचा राज्यातील ८५.६६ लाख पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळाला असून, सुमारे १८६६ कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा  झाल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. याप्रसंगी  कृषिमंत्री धनंजय मुंडे, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री दादाजी भुसे, अपर मुख्य सचिव अनुपकुमार आणि ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यातील शेतकरी उपस्थित होते.h

“राज्यात पावसाला चांगली सुरूवात झाली आहे… पेरणी झाली का? नागली घेता का? भात लावणीसाठी यंत्राची मदत घ्या, कमी वेळेत जास्त काम होईल, शिवाय मनुष्यबळही कमी लागेल…नागली, वरईसह आणि वेगवेगळ्या पिकांची लागवड करा, यातून उत्पन्न वाढण्यास मदत होईल” असे सांगतानाच राज्य शासन आपल्या पाठीशी असल्याची ग्वाही मुख्यमंत्री शिंदे यांनी शेतकऱ्यांना दिली.

Chief Minister Shinde interacted with farmers assured that the government is with him

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात