या व्हिडीओवरून विरोधक आणि सोशल मीडिया युजर्स मुख्यमंत्र्यांना ट्रोल करत आहेत.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्य्यावरून सध्या राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. एकीकडे जालन्यात मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केलं असल्याने, समाजाचे कार्यकर्ते आणि विरोधक आक्रमक सरकाविरोधात आक्रमक झाले आहेत. अशावेळी सरकारकडूनही हे उपोषण थांबवण्यासाठी आणि मराठा आरक्षणाबाबत आपली सकारात्मकता दर्शवण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. Chief Minister Shindes explanation regarding the viral video in the press conference
याचाच एक भाग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारपरिषद घेत सरकारची भूमिका मांडली. परंतु या पत्रकारपरिषदेच्या सुरुवातीस या तिघांमधील संवादाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला. या व्हिडीओवरून विरोधक आणि सोशल मीडिया युजर्स मुख्यमंत्री शिंदेंना ट्रोल करत आहेत. ज्यावर आता मुख्यमंत्री शिंदे यांनी ट्वीट करत स्पष्टीकरण दिलं आहे.
व्हिडीओमध्ये नेमंक काय? –
पत्रकारपरिषदेला सुरुवात करण्यासाठी जागेवर बसताना मुख्यमंत्री शिंदे फडणवीसांकडे पाहून म्हणतात, ”आपण बोलून मोकंळ व्हायचं, बोलून आपण निघून जायचं.” त्यावर अजित पवार ‘हो, येस्स” असं म्हणतात तर फडणीस मानेने होकर दर्शवतात
मराठा आरक्षणासाठी काल रात्री सर्वपक्षीय बैठक झाल्यानंतर पत्रकार परिषद सुरू होण्यापूर्वी सरकारमधील या तीन प्रमुख नेत्यांतील संवाद तरी पाहा. “आपण बोलून मोकळं व्हायचं” हे त्यांचे उद्गार मराठा आरक्षण प्रश्नी त्यांची असलेली अनास्था दर्शवित आहे. मराठा आरक्षणासाठी सर्व समाजबांधव… pic.twitter.com/172MQ4cxXH — Omprakash Rajenimbalkar (@OmRajenimbalkr) September 12, 2023
मराठा आरक्षणासाठी काल रात्री सर्वपक्षीय बैठक झाल्यानंतर पत्रकार परिषद सुरू होण्यापूर्वी सरकारमधील या तीन प्रमुख नेत्यांतील संवाद तरी पाहा. “आपण बोलून मोकळं व्हायचं” हे त्यांचे उद्गार मराठा आरक्षण प्रश्नी त्यांची असलेली अनास्था दर्शवित आहे.
मराठा आरक्षणासाठी सर्व समाजबांधव… pic.twitter.com/172MQ4cxXH
— Omprakash Rajenimbalkar (@OmRajenimbalkr) September 12, 2023
मराठा आरक्षणविषयक सर्वपक्षीय बैठकीनंतर सह्याद्री अतिथिगृह येथे पत्रकार परिषदेपूर्वी आपला आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांचा माईकवरील संवाद ‘सोशल मीडीया’वरून चुकीच्या पध्दतीने संपादित करुन फिरविणे अत्यंत खोडसाळपणाचे आहे. मराठा आरक्षणाबाबत सरकार सुरुवातीपासून संवेदनशील असून कायद्याच्या चौकटीत बसेल असे आरक्षण देण्याबाबत सरकार प्राधान्याने काम करीत आहे. तसेच मराठा आरक्षणाबाबत पहिल्यांदाच अशा सर्व पक्षांच्या नेत्यांना एकत्र बोलावून या विषयी त्यांचे एकमत घेण्यात आले आहे. शासनाने इतकी चांगली भूमिका घेतली असतांना मुद्दामहून काही विरोधक खोडसाळपणे आणि व्हिडीओ क्लिप चुकीच्या पद्धतीने संपादित करून लोकांच्या मनात गैरसमज पसरविण्याचे काम करीत आहेत हे अतिशय निंदनीय आहे. आमच्या एकमेकांमधील संवादाची मोडतोड करून संपादित करून दाखवून या घटकांनी जाणीवपूर्वक निंदनीय कृत्य केले आहे. शासन एकीकडे या संवेदनशील विषयावर ठोस भूमिका आणि निर्णय घेत आहे. अशा पार्श्वभूमीवर समाजात सोशल मीडियातून गैरसमज निर्माण करण्याचा कृत्याचा निषेध करावा तेवढा कमीच आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App