संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या आदल्या दिवशी मोदी सरकारने बोलावली सर्वपक्षीय बैठक


संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे.

विशेष प्रतिनिधी 

नवी दिल्ली : मोदी सरकारने बोलावलेल्या संसदेच्या विशेष अधिवेशनाबाबत एक नवीन अपडेट समोर आले आहे. केंद्र सरकारने संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या एक दिवस आधी म्हणजेच 17 सप्टेंबर रोजी दुपारी 4.30 वाजता सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली आहे. केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. सर्वपक्षीय बैठकीसाठी सर्व पक्षांच्या नेत्यांना निमंत्रित करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. An all party meeting was called by the Modi government on the day before the special session of Parliament

केंद्रातील मोदी सरकारने G-20 शिखर परिषदेच्या आधी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. हे सत्र 18 सप्टेंबर ते 22 सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. याबाबत केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी बुधवारी ट्विट केले की, या महिन्याच्या 18 तारखेपासून संसदेच्या विशेष अधिवेशनापूर्वी 17 सप्टेंबर रोजी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावण्यात आली आहे. याशिवाय सर्वपक्षीय बैठकीशी संबंधित नेत्यांनाही ईमेलद्वारे निमंत्रण पाठवण्यात आले आहे.

संसदेच्या विशेष अधिवेशनात काय अजेंडा असेल, यावर या सर्वपक्षीय बैठकीत काय चर्चा होणार असल्याचा अंदाज आहे. मोदी सरकारच्या नऊ वर्षांच्या कार्यकाळात पहिल्यांदाच संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे. या अधिवेशनात वन नेशन, वन इलेक्शन, महिला आरक्षण यासह अनेक महत्त्वाची विधेयके मांडली जाऊ शकतात. मोदी सरकारने वन नेशन, वन इलेक्शन यासंदर्भात समिती स्थापन केली आहे. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली समितीमध्ये सात सदस्यांचा समावेश आहे.

An all party meeting was called by the Modi government on the day before the special session of Parliament

महत्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात विठ्ठल रखुमाईला शोभुनी दिसतो तिरंगा!