गेल्या आठवड्यात त्यांना नवी दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. LK Advanis condition deteriorated again
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : माजी उपपंतप्रधान आणि भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना सोमवारी रात्री ९ वाजता डॉ.विनीत सुरी यांच्या देखरेखीखाली अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीत उपचार सुरू आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. अपोलो हॉस्पिटलने ही माहिती दिली आहे.
गेल्या आठवड्यात माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना नवी दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी त्यांना फॉलोअपसाठी येण्याचा सल्ला दिला होता. बुधवारी त्यांची प्रकृती खालावली. ९६ वर्षीय अडवाणी यांना बुधवारी रात्री उशिरा दिल्लीतील एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांना एम्सच्या जेरियाट्रिक विभागातील डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले होते.
प्राप्त माहितीनुसार, लालकृष्ण अडवाणी यांना बुधवारी 26 जून रोजी रात्री 10:30 वाजता त्यांना ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) मध्ये दाखल करण्यात आले होते. वयाच्या समस्येमुळे त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले होते. ते 2014 पासून ते सक्रिय राजकारणापासून दूर होते. एनडीएच्या संसदीय पक्षाच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांना त्यांच्या घरी भेटायला गेले आणि त्यांचे आशीर्वाद घेतले होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more