विशेष प्रतिनिधी
कोलकता – पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनकर यांच्याविरुद्धच्या वादात डाव्या आघाडीचे अध्यक्ष बिमान बोस यांनी थेट मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनाचा पाठिंबा दिल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. Left front backs Mammata Banarjee
राज्यपालांचे वागणे पदाला साजेसे नसल्याची टीका बोस यांनी केली आहे. त्यामुळे राज्यात आता राज्यपालांविरुद्ध तृणमुल व डावे असे दोन्ही मोठे राजकीय पक्ष उतरले आहेत. बोस म्हणाले की, राज्यपाल हे भाजपचे दूत असल्याप्रमाणे वागत आहेत.
त्यांची पक्षपाती भूमिका निषेधार्ह आहे. ते भाजपच्या बाजूचे नाहीत, पण त्यांचा कारभार ते भाजपधार्जिणे असल्याचे दाखवितो. राज्यपालांची भूमिका अशी असू शकत नाहीत. हे योग्य नाही. खास करून पश्चिम बंगालमध्ये राज्यपाल असे वागू शकत नाहीत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App