अजब चोरीची गजब कहाणी; सावधान इंडिया, क्राइम पेट्रोलमध्ये काम करणाऱ्या तरूणींनीच मारला ३ लाखांवर डल्ला


वृत्तसंस्था

मुंबई – क्राइम स्टोरीज वाचल्या – पाहिल्या जातात. टीआरपी वाढतो, याचे भांडवल करून आम्ही भारताला सावधान करतो, असा दावा करणाऱ्या क्राइम सिरियल्समध्ये काम करणाऱ्या दोन तरूणींनीच आपल्या हात चलाखीचा हिसका घरमालकाला दाखविला आहे. या दोन तरूणींनी त्या जिथे पेइंग गेस्ट म्हणून राहात होत्या त्या घरातून ३ लाख २८ हजार रूपये चोरले आहेत. Two women, who work in TV serials, arrested for stealing Rs 3.28 Lakhs from the paying guest accommodation they stayed at, in Aarey Colony

मुंबई पोलीसांनी या तरूणींना अटक केली आहे आणि त्यांच्याकडून ५० हजार रूपये वसूल केले आहेत. बाकीचे पैसे खर्च झाल्याचे त्यांनी पोलीसांना सांगितले आहे. या दोघी आरे कॉलनीतील एका घरात पेइंग गेस्ट म्हणून राहात होत्या. सावधान इंडिया आणि क्राइम पेट्रोल या मालिकांमध्ये त्या मिळेल तो छोटा – मोठा रोल करीत होत्या. त्या मालिकांमध्ये मिळालेला “चोरीचा अनुभव” वापरून त्यांनी घरातून वेगवेगळ्या वेळी काही रकमा चोरल्या.

अर्थात त्यांच्या चोरीमागे एक करूण कहाणी देखील जोडलेली आहे. कोरोना काळात शूटिंग थांबल्यामुळे त्यांना काम मिळेनासे झाले होते. घरखर्चाला आणि दैनंदिन खर्चाला देखील त्यांच्याकडे पैसे नव्हते. त्यामुळे त्यांनी ज्या घरात राहात होत्या त्याच घरात चोरी करण्याचा मार्ग चोखाळल्याचे पोलीसांनी सांगितले.

पण यातून ग्लॅमरस मालिकांचे दारूण वास्तव आणि त्यामध्ये काम करणाऱ्या छोट्या – मोठ्या नटनट्यांची अवस्था समोर आली आहे.

Two women, who work in TV serials, arrested for stealing Rs 3.28 Lakhs from the paying guest accommodation they stayed at, in Aarey Colony

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती