बंगालमध्ये भाजप फाटाफूटीचे आसाममध्ये पडसाद; राहुलजींच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह लावत काँग्रेसच्या तरूण आमदाराने सोडला पक्ष


वृत्तसंस्था

गुवाहाटी : पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालांनंतर भाजपमध्ये फार मोठी फाटाफूट होतीय, असे चित्र निर्माण करणाऱ्या विरोधकांना आणि त्यातही काँग्रेसला त्याचे परिणाम आसाममध्ये दिसून आले आहेत. Assam Congress MLA Rupjyoti Kurmi tenders his resignation as a Member of the State Legislative Assembly, to Speaker Biswajit Daimary

काँग्रेस नेतृत्वावर विशेषतः राहुल गांधींवर थेट राजकीय हल्ला चढवून आसाममधले तरूण काँग्रेस आमदार रूपज्योती कुर्मी यांनी काँग्रेस आणि आमदारकी दोन्ही सोडले आहे. राहुल गांधी यांच्याकडे काँग्रेसचे नेतृत्व असेपर्यंत पक्षाला भवितव्य नाही, अशा स्पष्ट शब्दांमध्ये रूपज्योती कुर्मी टीकास्त्र सोडले आहे.



आमदारीकाचा त्यांनी राजीनामा दिला आहे. ते म्हणाले, की आम्ही वारंवार काँग्रेस नेतृत्वाला सांगत होतो, आसाममध्ये सत्तेवर येण्याची संधी आहे. राज्यात तरूण नेतृत्वाला संधी द्या. बद्रुद्दीन अजमल यांच्या पक्षाशी युती करू नका. त्यामुळे काँग्रेसला नुकसान सोसावे लागेल. पक्षाची प्रतिमा जातीय आणि एका धर्माची बाजू उचलून धरणारा पक्ष अशी होईल. पण पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने आमचे ऐकले नाही. त्याचा परिणाम पक्षाच्या पराभवात झाला.

खासदार राहुल गांधी यांच्याकडे पक्षाचे नेतृत्व करण्याची क्षमता नाही. त्यांच्या खांद्यावर पक्षाची धूरा दिली तर काँग्रेस राजकीयदृष्ट्या पुढे सरकू शकणार नाही. काँग्रेसमध्ये तरूण नेतृत्वाचा आवाज ऐकला जात नाही. त्यामुळे प्रत्येक राज्यात काँग्रेसची हालत खस्ता झाली आहे, याकडे रूपज्योजी कुर्मी यांनी लक्ष वेधले.

Assam Congress MLA Rupjyoti Kurmi tenders his resignation as a Member of the State Legislative Assembly, to Speaker Biswajit Daimary

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात