बंगालमध्ये ४४ भाजप कार्यकर्त्यांची हत्या झालीय; ममतादीदी म्हणतात, हा राजकीय हिंसाचार नाही, ही भाजपचीच खेळी


वृत्तसंस्था

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूकीच्या प्रत्येक टप्प्यात हिंसाचार झाला. त्याची दखल केंद्रीय निवडणूक आयोगाने देखील घेतली. निवडणूक निकालानंतर देखील तेथे हिंसाचार झाला. त्यात भाजपचे ४४ कार्यकर्ते मारले गेल्याचे भाजप नेत्यांचे म्हणणे आहे……आणि तरीही मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणताहेत, बंगालमध्ये राजकीय हिंसाचार झालेलाच नाही. ज्या काही घटना घडल्यात, ती सगळी भाजपची खेळी आहे.political violence in West Bengal. We condemn violence. Political violence is a BJP gimmick. gone to UP where the dead bodies are floating: West Bengal CM

बंगालमधील हिंसाचारावर ममता बॅनर्जींचे हे स्टेटमेंट तेव्हा आले आहे, जेव्हा राज्याचे राज्यपाल जगदीप धनकड हे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात भेटत आहेत.



बंगालमध्ये राजकीय हिंसाचार झालेला नाही. राजकीय हिंसाचार तर उत्तर प्रदेशात होतोय. तिथे लोकांची प्रेते गंगेच्या पाण्यात वाहून येताहेत. भाजपच्या लोकांनी तिकडे लक्ष द्यावे, असे वक्तव्य ममता बॅनर्जी यांनी केले आहे.

पश्चिम बंगालमध्ये विधानसभेची निवडणूक लागल्यापासून ते निवडणूक निकाल लागल्यानंतर देखील सातत्याने हिंसाचाराच्या बातम्या आलेल्या आहेत. यामध्ये भाजपचे नेते आणि ममता बॅनर्जी यांची आरोप – प्रत्यारोपांची राळ उडत आहे.

पण खुद्द राज्यपालांनी जेव्हा राज्याच्या काही भागांचा स्वतंत्र दौरा केला, तेव्हा देखील अनेक नागरिकांनी त्यांच्यापाशी प्रत्यक्ष हिंसाचार झाल्याच्या तक्रारी केल्या होत्या. काही ठिकाणी राज्यपालांच्या गाड्यांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न झाला. राज्यपाल गाडीतून उतरल्यावर त्यांच्याकडे हिंसाचाराच्या तक्रारींची संख्या वाढली.

तृणमूळ काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले नेते सुवेंदू अधिकारी यांनी राज्यपालांची नुकतीच भेट घेऊन त्यांना राज्यातील हिंसाचारासंबंधी तपशीलवार माहिती दिली. राज्यपाल सध्या दिल्ली दौऱ्यावर असून त्यांनी राष्ट्रपतींची भेट घेतली आहे. ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची देखील भेट घेणार आहेत.

political violence in West Bengal. We condemn violence. Political violence is a BJP gimmick. gone to UP where the dead bodies are floating: West Bengal CM

महत्त्वाच्या बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात