Gold Hallmarking : केंद्र सरकराचा सराफा व्यापारांना दिलासा ; हॉलमार्क नसलेल्या दागिन्यांच्या दंडाबद्दल मोठा निर्णय


येत्या ऑगस्ट महिन्यापर्यंत हॉलमार्किंगच्या आदेशाचे पालन न करणाऱ्या व्यापारांवर कोणताही दंड आकारला जाणार नाही, अशी सूचना केंद्र सरकारने दिली आहे. 


विशेष प्रतिनिधी

मुंबई : गेल्या 15 जूनपासून सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्क  (Hallmark) असणे बंधनकारक करण्यात आलं आहे. या नव्या नियमानुसार, सराफा व्यापारांना 14, 18 आणि 22 कॅरेटच्या सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्क (BIS Hallmark) असल्यावरच त्याची विक्री करता येणार आहे. मात्र नुकतंच केंद्र सरकराने सराफा व्यापारांना आणखी एक दिलासा दिला आहे. येत्या ऑगस्ट महिन्यापर्यंत हॉलमार्किंगच्या आदेशाचे पालन न करणाऱ्या व्यापारांवर कोणताही दंड आकारला जाणार नाही. Gold Hallmarking no penalty will be imposed till August said central government

केंद्र सरकारने दिलेल्या आदेशानुसार, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने हा निर्णय घेतला आहे. काही दिवसांपूर्वी सराफा व्यापारांनी याबाबतची विनंती केली होती. या विनंतीनंतर सरकारने येत्या ऑगस्ट महिन्यापर्यंत हॉलमार्किंगच्या आदेशाचे पालन न करणाऱ्या व्यापारांवर कोणताही दंड आकारला जाणार नाही, अशी सूचना दिली आहे.

मात्र जर एखाद्या ग्राहकाने याबाबत तक्रार केली तर त्याच्या तक्रारीच्या नियमानुसार कारवाई केली जाईल. ग्राहक BIS CARE द्वारे किंवा ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या मदतीने ग्राहक पोर्टलवर तक्रारी करु शकता. देशात सोन्यावरील हॉलमार्किंग आतापर्यंत ऐच्छिक होते.

मात्र 2019 मध्ये केंद्र सरकारने 15 जानेवारी 2021 पासून सोन्यावर हॉलमार्क अनिवार्य करण्याची घोषणा केली होती. मात्र सोनारांनी जास्त वेळ मागितल्यानंतर अंतिम मुदत 15 जून 2021 पर्यंत पुढे ढकलण्यात आली होती  .

Gold Hallmarking : no penalty will be imposed till August said central government

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती