नितीन गडकरी यांनी सांगितला पेट्रोल-डिझेल महागाईला इथेनॉल हाच पर्याय,ग्राहकांची होईल २० रुपयांची बचत


पेट्रोल आणि डिझेलमधील महागाईला इथेनॉल हाच एक पर्याय आहे. पाश्चिमात्य देशांमध्ये विशेषत: अमेरिका, कॅनडा तसेच ब्राझीलमध्ये वाहन उत्पादकांनी मिश्र इंधनाचा पर्याय असणाºया वाहनांची निर्मिती सुरु केली आहे. या वाहनांमध्ये १०० टक्के पेट्रोल किंवा १०० टक्के बायो इथेनॉलचा पर्याय आहे, अशी माहिती केंद्रीय भपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.Nitin Gadkari says ethanol is the only alternative to petrol-diesel inflation, consumers will save Rs 20


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलमधील महागाईला इथेनॉल हाच एक पर्याय आहे. पाश्चिमात्य देशांमध्ये विशेषत: अमेरिका, कॅनडा तसेच ब्राझीलमध्ये वाहन उत्पादकांनी मिश्र इंधनाचा पर्याय असणाऱ्या वाहनांची निर्मिती सुरु केली आहे. या वाहनांमध्ये १०० टक्के पेट्रोल किंवा १०० टक्के बायो इथेनॉलचा पर्याय आहे, अशी माहिती केंद्रीय भपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.

गडकरी म्हणाले, भारतात देखील इथेनॉलचे उत्पादन वाढवण्यात आले आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे स्वस्त इंधन पर्याय बाजारात आवश्यक आहे. देशातील ७ हुन अधिक राज्यांमध्ये पेट्रोल दराने १०० रुपयांची पातळी ओलांडली आहे. मुंबई आणि हैदराबादमध्ये सहा आठवड्यांपूर्वीच पेट्रोलने शंभरी ओलांडली होती.



इथेनॉलचा दर प्रती लीटर ६० ते ६२ रुपये असेल. त्यातुलनेत पेट्रोल १०० रुपयांवर आहे. इथेनॉल आणि पेट्रोलच्या तुलना केल्यास एक लीटर इथेनॉल हे ७५० ते ८०० मिली पेट्रोल इतकं असेल, असे गडकरी यांनी सांगितले. यातही ग्राहकाची २० रुपयाची बचत होईल.

गडकरी म्हणाले, इथेनॉल किफायतशीर असून पर्यावरणपूरक तसेच देशांतर्गत उत्पादित होणारे इंधन आहे. रेसिंग कारसाठी इंधन म्हणून इथेनॉलचा वापर करतात, असेही गडकरी यांनी स्पष्ट केले. मागील काही वर्षात पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्याचे प्रमाण टप्याटप्यात वाढवण्यात आले आहे.

२०१४ मध्ये १ ते १.५ टक्का इथेनॉल मिक्स केलं जात होते. हे प्रमाण आता ८.५ टक्क्यांवर पोहोचले आहे. नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२५ पर्यंत देशात पेट्रोलमधील इथेनॉलचे प्रमाण २० टक्क्यांपर्यंत वाढण्याचे म्हटले होते.

Nitin Gadkari says ethanol is the only alternative to petrol-diesel inflation, consumers will save Rs 20

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात