एकमेका सहाय्य करू : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी घेतली विदर्भाच्या ऑक्सिजन पुरवठ्याची जबाबदारी ; अजित पवार


  • केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विदर्भाच्या ऑक्सिजन पुरवठ्याची जबाबदारी घेतल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं आहे.

विशेष प्रतिनिधी

पुणे : महाराष्ट्रात रेमिडीसिव्हर तसेच ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा भासतो आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तत्परता दाखवत रेमिडीसिव्हर उपलब्ध करून दिले. त्यानंतर त्यांनी नागपूरमध्ये ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. आता त्यांनी विदर्भाच्या ऑक्सिजन पुरवठ्याची जबाबदारी घेतली असल्याचे खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं आहे. Nitin Gadkari taken the responsibility of Oxygen supply for Vidarbha region : Ajit Pawar

“मी गडकरींशी बोललो, ते म्हणाले विदर्भातलं ऑक्सिजन पुरवठ्याचं आम्ही बघतो, बाकीचं तुम्ही बघा, असं वेगवेगळ्या भागातलं नियोजन वाढलं तर कोरोनाबाधितांना ऑक्सिजनचा पुरवठा करायला अडचण येणार नाही,” असं अजित पवार म्हणाले. पुण्यात अजित पवरांच्या उपस्थितीत आज कोरोनासंबंधी आढावा बैठक पार पडली. यावेळी बैठकीत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, भाजप खासदार गिरीश बापट, तसेच अन्य नेते उपस्थित होते. त्यानंतर अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

असं जर वेगवेगळ्या भागातलं नियोजन वाढलं तर कोरोनाबाधितांना ऑक्सिजनचा पुरवठा करायला अडचण येणार नाही,” असही अजित पवार म्हणाले.

व्हेंटीलेटर्ससाठी गडकरी

नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रातील कोरोना परिस्थितीसंदर्भात आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली होती. त्या चर्चेनंतर जगनमोहन रेड्डी यांनी महाराष्ट्राला 300 व्हेंटिलेटर्स देण्याचे जाहीर केले होते. सध्याची परिस्थिती पाहून गडकरी यांनी व्हेंटिलेटर्सच्या पुरवठ्यासाठी स्वत:हून पढाकार घेतला होता.

रेमडेसिव्हीरसाठी गडकरी

महाराष्ट्र आणि नागपूरमधील रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा पुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी प्रयत्न केले होते . कोविड’वरील उपचारासाठी आवश्यक ‘रेमडेसिव्हीर’ इंजेक्शनचा पुरवठा नागपूर आणि महाराष्ट्रात वाढवण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मायलन ‘व्हिटारीस इंडिया’चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रंजनीश बोंमजाई यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली होती. नितीन गडकरी यांच्या चर्चेनंतर नागपूरला चार हजार इंजेक्शन पाठवण्यात मिळाली होती.

ऑक्सिजनसाठी गडकरी

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नाने विशाखापट्टणमच्या आरआयएनएल प्लांटमधून महाराष्ट्राला आता दररोज ९७ मेट्रिक टन लिक्विड ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येणार आहे.

नितीन गडकरी यांना संकटमोचक म्हणतात ते उगाच नाही.

Nitin Gadkari taken the responsibility of Oxygen supply for Vidarbha region : Ajit Pawar

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात