ड्रग माफिया सुनील यादवची कॅलिफोर्नियात गोळ्या झाडून हत्या
विशेष प्रतिनिधी
चंदीगढ : Lawrence Bishnoi पंजाबमधील ड्रग माफिया सुनील यादवची अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. सुनील यादवने लॉरेन्स बिश्नोई गँगसोबत काम केले आहे. सुनील यादव बनावट पासपोर्टद्वारे भारतातून पळून गेला होता. त्यानंतर तो कॅलिफोर्नियातील स्टॉकटन शहरात होता आणि येथे त्याची हत्या करण्यात आली. कॅलिफोर्नियातील या गोळीबाराची जबाबदारी गोल्डी ब्रार आणि रोहित गोदारा टोळीने घेतली आहे.Lawrence Bishnoi
गोल्डी ब्रारने सोशल मीडियावर पोस्ट करून याची जबाबदारी घेतली आहे. ही पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे. त्यात म्हटले आहे, “मी, रोहित गोदारा आणि गोल्डी ब्रार, आज कॅलिफोर्नियातील स्टॉकटन येथील घर क्रमांक 6706 माउंट एल्बोर्स व्हाय येथे सुनील यादव उर्फ गोलिया विरम खेडा अबोहर यांच्या हत्येची संपूर्ण जबाबदारी घेतो. आमचा सर्वात लाडका भाऊ अंकित भादू याचा पंजाब पोलिसांशी सामना त्यांनीच घडवून आणला होता.
सुनील यादव हा एक मोठा ड्रग्ज माफिया असून तो आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत होता. आधी दुबई आणि नंतर अमेरिकेत त्यांचा व्यवसाय होता. राजस्थान पोलिसांनी सुनीलला रेड कॉर्नर नोटीस बजावली होती. राजस्थान पोलिसांनी सुनील यादवच्या सहकाऱ्याला दुबईतून अटक केली होती. सुनील यादवचे दुसरे नाव गोली वर्याम खेडा आहे. गंगानगर येथील पंकज सोनी हत्या प्रकरणात सुनील यादव याला राजस्थान पोलिसांनी अटक केली होती.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App