Rahul Gandhi : 54 वर्षांच्या आयुष्यात पहिल्यांदा राहुल गांधी मंडईत पोहोचले, लसणाचा भाव ऐकून चकित झाले!!

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : आपल्या 54 वर्षांच्या आयुष्यात पहिल्यांदा राहुल गांधी मंडईत पोहोचले आणि लसणाचा भाव ऐकून झाले.

राहुल गांधी जन्मापासून आतापर्यंत 54 वर्षांच्या आयुष्यात दिल्लीतच राहिले, पण ते पहिल्यांदा दिल्लीतल्या गिरीनगर मधल्या मंडईत आज सकाळी पोहोचले. तिथे त्यांचे समर्थक आधीच जमा झाले होते. त्या मंडईत राहुल गांधींनी वेगवेगळ्या भाजीवाल्यांकडे जाऊन भाजीचे भाव विचारले. भाज्यांचे भाव गगनाला भिडल्याचे राहुल गांधींना प्रथमच समजले. लसणाचा भाव 400 रुपये किलो झाल्याचे ऐकून ते अवाक झाले. तिथे असलेल्या त्यांच्या समर्थक महिलेने एक वेळ सोने स्वस्त होईल, पण लसूण स्वस्त होणार नाही, अशी टिप्पणी केल्यावर राहुल गांधी हसले.

मंडईतल्या भाजीवाल्यांशी आणि आपल्या समर्थक ग्राहकांशी त्यांनी गप्पा मारल्या. महागाई खूप वाढली आहे. सरकार कुंभकर्ण सारखे झोपले आहे. आमचे सरकार आल्यानंतर स्वस्त करू, असे आश्वासन राहुल गांधींनी या सगळ्यांना दिले.

तिथे समर्थक महिलेने राहुल गांधींना चहा पाण्यासाठी घरी बोलावले. ते तिच्या घरी गेले. सगळ्यांनी राहुल गांधींशी गप्पा मारल्या. चहाचा आस्वाद घेताना सगळ्यांनी महागाईवर चर्चा केली.

राहुल गांधींनी या सगळ्या घटनाक्रमाचा व्हिडिओ आपल्या सोशल मीडिया अकाउंट वर शेअर करून महागाई खूप वाढली असून 400 रुपये किलो झाला. सरकार कुंभकर्ण सारखे झोपले आहे, अशा तोफा डागल्या.

Rahul Gandhi reaches Mandi for the first time in his 54-year life

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात