आज काश्मीरमधील G20 बैठकीचा अखेरचा दिवस, नायब राज्यपाल सिन्हा म्हणाले- जम्मू-काश्मीरचा लवकरच जगातील टॉप 50 पर्यटन स्थळांमध्ये समावेश होईल


वृत्तसंस्था

श्रीनगर : श्रीनगरमध्ये आज G20 पर्यटन कार्यगटाच्या बैठकीचा तिसरा आणि शेवटचा दिवस आहे. पर्यटन कार्यगटाच्या तिसऱ्या बैठकीदरम्यान G20 प्रतिनिधींनी क्राफ्ट मार्केटमध्ये खरेदी केली. दुसऱ्या दिवसाच्या बैठकीदरम्यान, जम्मू आणि काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा म्हणाले की, जम्मू आणि काश्मीर लवकरच जगातील टॉप 50 पर्यटन स्थळांमध्ये स्थान मिळवेल.Last day of G20 meeting in Kashmir today, Lt Governor Sinha said – Jammu and Kashmir will soon be included in the top 50 tourist destinations of the world

5 देश सहभागी झाले नाहीत

या बैठकीत चीन, सौदी अरेबिया, तुर्की, इंडोनेशिया आणि इजिप्त सहभागी झाले नाहीत. मात्र, या बैठकीनंतर काश्मीरमध्ये परदेशी पर्यटकांची संख्या झपाट्याने वाढेल, असा विश्वास काश्मीरमधील तरुणांना आहे. दुसरीकडे, 22 मे रोजी श्रीनगरला पोहोचलेल्या इतर परदेशी प्रतिनिधींचे विमानतळावर पारंपरिक वेशभूषेत काश्मिरी मुलींनी स्वागत केले.



लेफ्टनंट गव्हर्नर सिन्हा म्हणाले – शेजारी देशाने काश्मीरची शांतता हिरावली

श्रीनगरमध्ये G20 टुरिझम वर्किंग ग्रुपच्या दुसऱ्या दिवसाच्या बैठकीत नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी पाकिस्तानचे नाव न घेता निशाणा साधला. ते म्हणाले की, जम्मू-काश्मीर हे नेहमीच ज्ञानाचे आणि मनोहारी स्थळांचे केंद्र राहिले आहे. शेजारी देशांनी पसरवलेल्या दहशतीमुळे 30 वर्षांपासून येथील शांतता प्रभावित झाली आहे.

परदेशी पाहुण्यांची डल सरोवरात शिकारा राईड

काश्मीरमधील श्रीनगर येथे G-20 पर्यटन कार्यगटाच्या बैठकीच्या पहिल्या दिवशी प्रतिनिधींनी बैठकीनंतर रात्री डल सरोवराला भेट दिली. काश्मीरच्या प्रसिद्ध शिकारा बोटीत परदेशी पाहुणेही बसले. या बैठकीत परदेशातील पाहुण्यांशिवाय दक्षिणेतील अभिनेता रामचरण तेजादेखील सहभागी झाले होते.

Last day of G20 meeting in Kashmir today, Lt Governor Sinha said – Jammu and Kashmir will soon be included in the top 50 tourist destinations of the world

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात