वृत्तसंस्था
नवी दिल्ली : वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा (नीट) ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी देशभरातील विद्यार्थ्यांनी केली आहे. Kindly Postponed NIIT Exam; Student Request to Goverment
‘नीट’ परीक्षा कधी घ्यायची याचा निर्णय केंद्र सरकार आणि राष्ट्रीय चाचणी संस्था (एनटीए) घेणार आहे. त्यासंदर्भात केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या नेतृत्वाखाली मंत्र्यांची बैठक झाली.
सर्व राज्यांच्या शिक्षणमंत्र्यांना यासंदर्भात अहवाल पाठवण्याच्या सूचना बैठकीनंतर देण्यात आल्या. जेईई मेनची उर्वरित सत्रे आणि ‘नीट’ परीक्षा घेण्यात याव्यात यावर बैठकीत एकमत झाले. मात्र, परीक्षेच्या तारखा जाहीर केलेल्या नाहीत.
दरम्यान, बारावीची परीक्षा देणारे विद्यार्थीही ‘नीट’ परीक्षेला बसण्याची शक्यता आहे. बारावीच्या परीक्षांची तारीख जाहीर झाली नसल्याने ‘नीट’ साठी आणखी काही वेळ मिळावा, अशी विद्यार्थ्यांची विनंती आहे. ल अगदी पदवीपूर्व ‘नीट’ परीक्षेबाबतही निर्णय घेण्यापूर्वी सरकारने सर्व बाबींचा विचार करावा, असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App