Old is Gold : ये उन दिनोंकी बात है ! ट्विटरवर Orkut अव्वल ; का होतोय ट्रेंड ; भन्नाट मिम्ससह जाणून घ्या #Orkut विषयी


Old is Gold : ये उन दिनोंकी बात है! ट्विटरवर Orkut अव्वल ;
Orkut का होतोय ट्विटरवर ट्रेंड ; भन्नाट मिम्ससह जाणून घ्या #Orkut विषयी


फेसबुक आणि ट्विटरवर बंदी घातल्याची भीती व्यक्त करीत सोशल मीडियावर ‘Orkut’ ट्रेंड बनला आहे.एवढंच नाही तर Orkut पुन्हा सुरू करा.. अशीही मागणी काही नेटकऱ्यांनी केली आहे.


Orkut, Google च्या मालकीचे आणि ऑपरेट केलेले,  २००० च्या उत्तरार्धात सर्वाधिक भेट दिलेल्या सोशल मीडिया वेबसाइटपैकी एक होते.


तरुण पिढीला orkutविषयी फार माहिती नाही. पण ९० च्या दशकातले लोक orkutला सर्वोत्कृष्ट म्हणत आहेत.
Old is Gold: These are the things of those days! Orkut tops Twitter; Why Orkut is trending on Twitter; Learn about #Orkut with abandoned mimes


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली: Orkut मायक्रो-ब्लॉगिंग वेबसाइट ट्विटरच्या पहिल्या ट्रेन्डिंग लिस्टमध्ये सामील झाले आहे. यानंतर,  काही मजेदार ट्विट केले आहेत, जे आपल्या चेहर्यावर हास्य पसरवू शकतात. Orkut एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. एकेकाळी, Orkut जगभरात लोकप्रिय होते. परंतु फेसबुक आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या यशानंतर ऑर्कुटचा वापर लक्षणीय प्रमाणात कमी झाला. तरुण पिढीला ऑर्कुटविषयी फारच माहिती नाही. पण ९० च्या दशकातले लोक Orkutला सर्वोत्कृष्ट म्हणत आहेत. Orkut पुन्हा एकदा ट्विटरवर ट्रेंड होत आहे.गमतीदार मिम्स पोस्ट करत अनेकांना आपले जुने दिवस आठवले आहेत .
ये उन दिनोंकी बात है जनाब तुम नहीं समझोगे!Old is Gold: These are the things of those days! Orkut tops Twitter; Why Orkut is trending on Twitter; Learn about #Orkut with abandoned mimes

एकीकडे केंद्र सरकारने नवं डिजिटल धोरण आणण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे Whats App, फेसबुक, ट्विटर यांचं काय होणार? ही अॅप किंवा सोशल नेटवर्किंग साईट्स बंद पडणार का? अशी चर्चा रंगते आहे. अशात दिवसभर आज एक हॅशटॅग ट्रेंड होतो आहे तो आहे #Orkut.

काय आहे Orkut?

Orkut ही एक सोशल नेटवर्किंग साईट होती. जी गुगलने २००४ मध्ये सुरू केली. या सर्व्हिसद्वारे लोकांनी साईन इन केल्यावर त्यांना त्यांच्या जुन्या मित्रांसोबत कनेक्ट राहणं सोपं गेलं. Orkut ला २००८ पर्यंत भारतात आणि ब्राझिलमध्ये खूप चांगला प्रतिसाद मिळाला.

मात्र नंतर इतर सोशल नेटवर्किंग साईट आल्या, Whats App आलं आणि हळूहळू Orkut ची लोकप्रियता कमी होऊ लागली. आत्ता जसं आपण एकमेकांना विचारतो की अरे तू व्हॉट्स अॅपवर आहेस का तसं पूर्वी तू ऑरकुटवर आहेस ना? असं सर्रासपणे विचारलं जात होतं. मात्र या सोशल नेटवर्किंग साईटचा प्रभाव कमी झाल्याने आणि इतर साईट्स आल्याने गुगलने ही सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला.

३० जून २०१४ ला गुगलने ऑरकुट बंद होत असल्याचं जाहीर केलं आणि ३० सप्टेंबर २०१४ ला ऑरकुट बंद झालं.  ही सोशल नेटवर्किंग साईट म्हणजे फेसबुकचं आधीचं व्हर्जन होतं.

अमेरिका, जपान, ब्राझिल, नेदरलँड, युके, भारत या देशांमध्ये ऑरकुट प्रसिद्ध होतं. ऑरकुट सुरु झालं तेव्हा त्याचा ट्रेंड सर्वाधिक जास्त अमेरिकेत होता. नंतर तो तिथेही कमी झाला.

ऑरकुटचा हॅशटॅग  ट्रेंड

आज दिवसभर ट्विटर #Orkut हा हॅशटॅग ट्रेंड केला जातो आहे. अनेकांना ज्यांनी ऑरकुट वापरलं त्यांना फेसबुक, ट्विटर आणि व्हॉट्स अॅप बंद होणार आहे का?

याची चर्चा वाचून आपल्या ऑरकुट अकाऊंटची आठवण झाली आहे. यावरून सोशल मीडियावर काही मीम्सही फिरत आहेत.

Orkut २००७ ते २०११ या कालावधीत भारतात खूप जास्त पॉप्युलर होतं. त्यामुळे हा ट्रेंड ट्विटरवर सुरू झाला आहे.

Old is Gold: These are the things of those days! Orkut tops Twitter; Why Orkut is trending on Twitter; Learn about #Orkut with abandoned mimes

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण