वृत्तसंस्था
नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Kejriwal) यांच्याविरोधात भाजप आयटी सेलने दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यावर सोमवारी (12 ऑगस्ट) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने या खटल्याला पुन्हा 6 आठवड्यांची स्थगिती दिली.
प्रकरण मे 2018 चे आहे. अरविंद केजरीवाल यांनी यूट्यूबर ध्रुव राठीचा भाजप आयटी सेलवर आधारित कथित दिशाभूल करणारा व्हिडिओ रिट्विट केला होता. यावर भाजप आयटी सेलने केजरीवाल यांच्यावर मानहानीचा खटला दाखल केला होता. त्यावर ट्रायल कोर्टाने केजरीवाल यांना समन्स बजावले.
याविरोधात ते दिल्ली उच्च न्यायालयात गेले, मात्र न्यायालयाने समन्सला स्थगिती देण्यास नकार दिला. त्यानंतर केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या खटल्याची सुनावणी न्यायमूर्ती संजीव खन्ना, न्यायमूर्ती संजय कुमार आणि आर. महादेवन यांच्या खंडपीठात होत आहे.
26 फेब्रुवारी 2024 रोजी केजरीवाल यांच्या वतीने ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी सांगितले होते की, केजरीवाल रिट्विटवर माफी मागण्यास तयार आहेत. यावर विचार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने तक्रारदाराला (भाजप आयटी सेल) वेळ दिला होता.
मविआचा मुख्यमंत्री कोण??; पृथ्वीराज बाबांचे मत दुर्लक्षित करण्यासारखे नाही; पवारांची कबुली!!; पण ती का द्यावी लागली??
प्रकरण मे 2018 चे आहे
2018 मध्ये एका ट्विटमध्ये ध्रुव राठीने ‘आय सपोर्ट नरेंद्र मोदी’ नावाच्या ट्विटर पेजच्या संस्थापक आणि ऑपरेटरवर भाजप आयटी सेल भाग-2 प्रमाणे वागण्याचा आरोप केला होता. दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी हे ट्विट रिट्विट केले आहे. या व्हिडिओमध्ये विकास सांकृत्यायन नावाच्या व्यक्तीबद्दल अपमानास्पद गोष्टी बोलल्या गेल्या होत्या.
जेव्हा हे प्रकरण दिल्ली उच्च न्यायालयात पोहोचले तेव्हा न्यायालयाने हे प्रकरण रद्द करण्यास नकार देत म्हटले की मोठ्या संख्येने लोक ट्विटरवर केजरीवालांना फॉलो करतात. त्यांनी तक्रारदाराविरुद्ध केलेल्या अपमानास्पद टिप्पणीची पडताळणी न करता रिट्विट केली आणि ती कोट्यवधी लोकांपर्यंत पोहोचवली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more