पॅरिस ऑलिम्पिक 2024 मधला भारताचा प्रवास संपला असून 117 खेळाडूंनी 16 खेळांमध्ये सहभाग घेऊन 6 पदके मिळवली. यंदाच्या ऑलिंपिकमध्ये भारताला एकही सुवर्ण पदक जिंकता आले नाही. वास्तविक यंदाच्या ऑलिपिंकमध्ये भारतीय खेळाडूंकडून जास्त पदांची अपेक्षा होती. पण ती अनेक कारणांनी पूर्ण होऊ शकली नाही. मात्र आता त्याच मुद्द्यावर माध्यमांनी भारताने खेळाडूंवर केलेला खर्च आणि त्यांनी मिळवलेली पदके यांचा हिशेब मांडून नकारात्मक नॅरेटिव्ह रचायला सुरवात केली आहे.
पॅरिस ऑलिंपिकमध्ये भारताने 16 खेळांसाठी 117 खेळाडूंच्या प्रशिक्षणासाठी तब्बल 470 कोटी रुपयांचा खर्च केला. हा प्रचंड खर्च करून देखील भारतीय खेळाडूंना फक्त 6 पदके जिंकता आली. या 6 पदकांचा विचार केला, तर भारताला 78.33 कोटी रूपये एका पदकासाठी खर्च करावे लागले, असे त्रैराशिक माध्यमांनी मांडले. या खर्चामध्ये सर्वात जास्त खर्च हा ॲथलेटिक्स आणि बॅडमिंटन वर झाला. यामध्ये फक्त नीरज चोप्रा याने रौप्यपदक जिंकलं, इतर कोणालाही पदक मिळवता आले नाही, अशी मखलाशी माध्यमांनी केली.
पी. व्ही. सिंधू, लक्ष्य सेन, सात्विक साईराज रँकी रेड्डी, चिराग शेट्टी आणि एचएस प्रणॉय यांनी बॅडमिंटनमध्ये भाग घेतला. त्यांच्या प्रशिक्षणावर एकूण 72.03 कोटी रुपये खर्च झाले. मात्र, कोणालाही पदक जिंकता आले नाही. बॉक्सिंग या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर आहे, ज्यामध्ये लोव्हलिना बोरगोहेन आणि निखत जरीनसह 6 बॉक्सर्सनी भाग घेतला. त्याच्या प्रशिक्षणासाठी 60.93 कोटी रुपये खर्च झाले. शूटिंग स्पोर्ट्सवर 60.42 कोटी रुपये खर्च करण्यात आले. यामध्ये मनू भाकर आणि सरबज्योत सिंग यांनी मिळून 2 पदके जिंकली. हॉकी प्रशिक्षणासाठी 41.3 कोटी रुपये आणि कुस्ती प्रशिक्षणासाठी 37.8 कोटी रुपये खर्च आला. तिरंदाजीसाठी 39.18 कोटी रुपये खर्च करण्यात आले. हॉकीत भारताने ब्राँझ पदक जिंकले.
भारताने एकून 6 पदके जिंकली. यामध्ये 4 पदके वैयक्तिक आणि 2 पदके सांघिक खेळांमध्ये जिंकली. नीरज चोप्राच्या प्रशिक्षणासाठी सर्वाधिक 5.72 कोटी रुपये खर्च झाला. नेमबाजीत कांस्यपदक जिंकणाऱ्या मनू भाकरवर 1.68 कोटी रुपये आणि संघ स्पर्धेत तिला साथ देणाऱ्या सरबज्योत सिंगच्या प्रशिक्षणावर 1.46 कोटी रुपये खर्च करण्यात आले, तर नेमबाजीमध्ये स्वप्नील कुसाळेला 1.6 कोटी तर पदक विजेत्यांमध्ये सर्वांत कमी खर्च कुस्तीपटू अमन सेहरावतवर झाला.
Bangladesh : बांगलादेशात 52 जिल्ह्यांमध्ये हिंदूंवर 205 हल्ले; हजारो हिंदू आंदोलक रस्त्यावर; आता मोहम्मद युनूस यांना शांततेची उपरती!!
सुवर्णपदकापासून एक पाऊल दूर राहणाऱ्या विनेश फोगाटवर सर्वात कमी म्हणजे 70.45 लाख रुपये खर्च झाला. सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी या जोडीवर सर्वात जास्त 5.32 कोटी खर्च केले, तर पीव्ही सिंधूवर 3.13 कोटी, मीराबाई चानू 2.74 कोटी, निश भानवालावर 2.41 कोटी रुपये, रोहन बोपन्नावर 1.56 कोटी रुपये, मनिका बत्रावर 1.3 कोटी रूपये खर्च झाले होते.
माध्यमांनी खर्चाचा हा ताळेबंद मांडून भारतीय ऑलिंपिक खेळाडूंविषयी नकारात्मक नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न चालवला आहे. वास्तविक आत्ता कुठे म्हणजे गेल्या 2 ऑलिंपिक पासून भारत विविध खेळांमध्ये चमक दाखवू लागला आहे. 16 क्रीडा प्रकरण मध्ये भाग घेणे आणि त्यामध्ये चौथ्या पाचव्या क्रमांकावर येणे ही देखील खरं म्हणजे भारतीय खेळाडूंची अचीवमेंट आहे कारण भारत आत्तापर्यंत फक्त हॉकी किंवा कुस्ती किंवा फार तर नेमबाजी यामध्ये चमक दाखवू शकला होता त्यातही भारताचा हॉकीतला सुवर्णकाळ लोटून 40 वर्षांनंतर भारताला पुन्हा पदके मिळायला सुरुवात झाली. टोकियोमध्ये 2020 आणि पॅरिस मध्ये 2024 हॉकीत भारताने सलग दोन ब्राँझ पदके मिळवली. ही भारतीय हॉकी टीमची खरी अचीवमेंट आहे. पण 470 कोटींचा खर्च आणि 6 पदके असे नॅरेटिव्ह सेट करून माध्यमांनी भारतीय खेळाडूंचे मनोधैर्य खच्ची करण्याचा प्रयत्न चालविला आहे.
जागतिक खर्च किती??
या पार्श्वभूमीवर जागतिक पातळीवरच्या अव्वल 5 देशांच्या खेळाडूंवरच्या खर्चाचा नुसता आढावा घेतला आणि ते आकडे वाचले, तरी माध्यमांचे डोळे पांढरे होतील. सर्वाधिक विकसित देश अमेरिका ऑलिंपिक खेळांवर आणि खेळाडूंवर 20000 कोटी डॉलर्स खर्च करतो. चीन 18 ते 20 हजार कोटी डॉलर्स खर्च करतो. ब्रिटनचा हाच खर्च 11000 कोटी डॉलर्स आहे. रशियाचा हा खर्च 15000 कोटी डॉलर्स पर्यंत पोहोचतो. या विकसित देशांपैकी चीन आणि रशिया कधीच आपला अधिकृत खर्च जाहीर करत नाहीत. त्यामुळे त्यांच्या खर्चाचे आकडे आर्थिक अनुमानाचे जरी मानले ,तरी ते हजारो कोटींच्या पटीत आहेत ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही.
भारतीय क्रीडा क्षेत्रावर माध्यमांचे नकारात्मक जाळे
चीन – अमेरिका 35 – 40 सुवर्णपदके मिळवतात. त्या पाठोपाठ फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, जर्मनी हेही डबल डिजिटमध्ये सुवर्णपदके मिळवतात, पण त्यांचे खर्च हजारो कोटी डॉलर्स मध्ये आहेत, ही बाब नजरेआड करून चालता येणे कठीण आहे. त्या तुलनेत भारत आत्ता कुठे 500 कोटींच्या आसपास खर्च करू लागला आहे, तर माध्यम भारतातील गरिबी आणि खेळाडूंवरचा प्रचंड खर्च यावर नकारात्मक टीका टिपण्णी करत आहेत. भारताचा खेळाडूंवरचा खर्च मांडून त्यांच्याकडून जास्त पदकांची अपेक्षा करून पुन्हा त्यांच्याच विषयी नकारात्मक नॅरेटिव्ह सेट करायचे काम माध्यमे करत आहेत. असले नकारात्मक जाळे टाकून माध्यमांना भारतीय क्रीडाक्षेत्र नेमके कोणत्या दिशेला न्यायचे आहे??
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more