वृत्तसंस्था
नवी दिल्ली : अमेरिकेने क्षेपणास्त्रांनी ( Missile ) सुसज्ज असलेल्या पाणबुड्या आणि F-35C लढाऊ विमानांनी सुसज्ज विमानवाहू जहाजे मध्य पूर्वेकडे पाठवली आहेत. इस्रायल आणि इराणमधील युद्धाची वाढती भीती लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. इस्रायलचे संरक्षण मंत्री योव गॅलंट आणि अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉयड ऑस्टिन यांच्यात झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. इस्रायलच्या संरक्षणासाठी अमेरिका कटिबद्ध असल्याचे अमेरिकेच्या संरक्षणमंत्र्यांनी सांगितले.
यापूर्वी 1 ऑगस्ट रोजी वॉशिंग्टन पोस्टने आपल्या वृत्तात म्हटले होते की, अमेरिकेने मध्यपूर्वेत 12 नवीन युद्धनौका तैनात केल्या आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी फोनवरील संभाषणात इस्रायलचा बचाव करण्याचे आश्वासन दिले.
मविआचा मुख्यमंत्री कोण??; पृथ्वीराज बाबांचे मत दुर्लक्षित करण्यासारखे नाही; पवारांची कबुली!!; पण ती का द्यावी लागली??
इराण इस्रायलवर हल्ला करू शकतो
येत्या दोन दिवसांत इराण इस्रायलवर हल्ला करू शकतो, असा दावा अमेरिकन मीडिया हाऊस एक्सिओसने केला आहे. इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धविराम आणि ओलीस करार होण्यापूर्वी गुरुवारी हा हल्ला होऊ शकतो. इस्त्रायली गुप्तचर विभागाशी संबंधित दोन लोकांच्या हवाल्याने एक्सिओसने हा दावा केला आहे.
याआधी गेल्या आठवड्यात शुक्रवारी संयुक्त राष्ट्रातील इराणच्या प्रतिनिधीने सांगितले होते की, आम्ही वेळेवर आणि संभाव्य युद्धविरामामुळे कोणतीही हानी होणार नाही, अशा प्रकारे प्रत्युत्तर देऊ.
लुफ्थांसाने इस्रायलला जाणारी उड्डाणे रद्द केली
जर्मन एअरलाइन कंपनी लुफ्थान्साने इस्रायल, इराण आणि लेबनॉनच्या फ्लाइट्सवरील बंदी वाढवली आहे. आता लुफ्थांसाने 21 ऑगस्टची सर्व उड्डाणे रद्द केली आहेत. लुफ्थांसाने इराण आणि इराकची हवाई हद्द वापरण्यासही नकार दिला आहे.
याआधी भारतीय विमान कंपनी एअर इंडियानेही इस्रायलकडे जाणारी उड्डाणे अनिश्चित काळासाठी रद्द केली आहेत.
चीन इराणच्या समर्थनार्थ पुढे आला
इराण आणि इस्रायलमधील युद्धाचा धोका वाढत असताना चीनने इराणला पाठिंबा दिला आहे. रविवारी चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी इराणचे कार्यवाहक परराष्ट्र मंत्री अली बगेरी कानी यांच्याशी फोनवर चर्चा केली. चर्चेदरम्यान वांग यी म्हणाले की चीन इराणचे सार्वभौमत्व जपण्यासाठी त्यांना पाठिंबा देतो.
वांग यी यांनी इराणमधील हमास प्रमुख हानियेह यांच्यावर झालेल्या हल्ल्याचाही निषेध केला. हमास प्रमुखाच्या हत्येमुळे इराणच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन झाल्याचे चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी म्हटले आहे. त्यामुळे प्रादेशिक स्थिरतेला धोका वाढला आहे.
गेल्या महिन्यात 31 जुलै रोजी इराणमध्ये हमास प्रमुख हानीयेह यांची हत्या करण्यात आली होती. इराणच्या म्हणण्यानुसार, हानीयेह यांच्यावर कमी पल्ल्याच्या क्षेपणास्त्राने हल्ला करण्यात आला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more