विशेष प्रतिनिधी
पुणे : मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या गुंत्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ओढणाऱ्या शरद पवारांना भाजपचे आमदार आशिष शेलार Ashish shelar यांनी खोचक सवाल केला. केंद्रात मनमोहनसिंग यांच्या सरकार मध्ये असताना पवारांनी आरक्षण मर्यादा 50 % वर का नेली नाही?? यूपीए सरकारच्या काळात तसा निर्णय का घेतला नाही??, हे सवाल शेलारांनी केले. Ashish shelar
पुण्यात आज महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या नवीन कार्यालयाचं उद्घाटन आज झालं. या सोहळ्यासाठी शरद पवार आणि आशिष शेलार एकत्र आले होते. पुण्यातील मोदीबागेत या नवीन कार्यालयाचं शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन झालं. यावेळी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रोहित पवारही उपस्थित होते. आशिष शेलार यांनी या कार्यक्रमानंतर माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा राज्यात चिघळलेल्या आरक्षण प्रश्नावर त्यांनी भाष्य केलं. शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीला त्यांनी महत्वाचं आवाहन केलं आहे.
शेलार आरक्षणावर काय म्हणाले?
आमचा प्रश्न पुन्हा पवार साहेबांना तोच आहे की त्यांनी भूमिका स्पष्ट करावी. मनोज जरांगे यांची जी भूमिका आहे त्यावर तुमची आणि महाविकास आघाडीची भूमिका काय आहे?? उद्धव ठाकरे, काँग्रेस यांना सुद्धा माझा तोच प्रश्न आहे. शरद पवारसाहेबांचं मौन योग्य नाही. तुमचं सरकार मनोहन सिंह यांच्या काळात का नाही निर्णय घेतला? तुम्ही मंत्री असताना हे का केलं नाही. आज ही कायद्यात 50 % पेक्षावर जाता येईल पण ते सिद्ध करावं लागेल, असं आशिष शेलार म्हणाले.
Siddheshwarnath temple : बिहारच्या सिद्धेश्वरनाथ मंदिरात चेंगराचेंगरी, 7 भाविकांचा मृत्यू; 12 हून अधिक जखमी; पायऱ्या चढताना दुर्घटना
मनोज जरांगेंच्या भूमिकेवर म्हणाले…
मनोज जरांगेंची आरक्षणाची मागणी योग्य आहे. भाजपचं त्याला समर्थन आहे. पञ आंदोलनकर्ते आणि त्यातील वक्तव्य, त्याचे बोलावते धनी याचं समर्थन होणार नाही. मनोज जरांगे यांनी आमचे मत समजून घ्यायला हवं. शरद पवार आणि काँग्रेस सरकार यांच्यावर तुम्ही का टीका करत नाही?? देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकले, तरी फक्त त्यांच्यावर का टीका करता? राज्यात एकनाथ शिंदे सरकार आहे. मग फक्त फडणवीस यांच्यावर का टीका करता?? एकेरी टीका फडणवीस यांच्यावर करण्याचा आम्ही निषेध करतो, असंही आशिष शेलार म्हणाले.
आज एमसीएच्या कार्यालयाचं उद्घाटन झालं आहे. बीसीसीआय खजिनदार म्हणून मी इथे आलो होतो. मध्यभागी असलेल्या कार्यालयामुळे नक्कीच सगळ्यांना अपेक्षा पूर्ण होतील. क्रिकेटमध्ये राजकारण आणू नये, असंही आशिष शेलार म्हणाले. दरम्यान आज उद्घाटन झाल्यानंतर आता या नवीन कार्यालयातून महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचं कामकाज चालणार आहे. येत्या ऑक्टोबर महिन्यामध्ये पुण्यातील क्रिकेट रसिकांसाठी पर्वणी एक मोठी संधी असणार आहे. पुण्यातील स्टेडियममध्ये भारत विरूद्ध न्यूझीलंड टेस्ट मॅच सामने पार पडणार आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more