बांगलादेशात होत असलेल्या हिंसाचाराच्या विरोधात हिंदू समुदायही मोठ्या प्रमाणावर निदर्शने करत आहे.
विशेष प्रतिनिधी
लखनऊ : बांगलादेशात नुकतेच शेख हसीना यांचे सरकार पाडण्यात आले. यानंतर पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन शेख हसीना भारतात आल्या. मात्र, त्यांनी सत्ता सोडताच बांगलादेशात हिंसाचाराचा भयंकर काळ सुरू झाला. देशात हिंदू आणि इतर अल्पसंख्याकांवर अत्याचार होऊ लागले. आता बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी अल्पसंख्याकांवरील या हिंसाचारावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. बांगलादेशच्या मुद्य्यावर मायावती काय म्हणाल्या ते जाणून घेऊया.
बांगलादेशमध्ये गेल्या काही दिवसांपासून हिंदू समुदाय आणि इतर अल्पसंख्याकांना जात आणि वर्गाचा विचार न करता होत असलेला हिंसाचार अत्यंत दुःखद आणि चिंताजनक आहे, असे बसपा प्रमुख मायावती यांनी म्हटले आहे. केंद्र सरकारने हे प्रकरण गांभीर्याने घेऊन योग्य ती पावले उचलावीत, अन्यथा त्यांचे मोठे नुकसान होऊ शकते, असे आवाहन मायावतींनी मोदी सरकारला केले आहे.
बांगलादेशात होत असलेल्या हिंसाचाराच्या विरोधात हिंदू समुदायही मोठ्या प्रमाणावर निदर्शने करत आहे. ढाक्याबरोबरच मैमन सिंग, मदारीपूर, फरीदपूर, मौलवीबाजार, बोगुरा, सुनमगंज येथे जोरदार निदर्शने झाली. डू समाजाचे लोक आपल्या संपूर्ण कुटुंबासह रस्त्यावर उतरले आहेत. फलक, पोस्टर आणि बॅनर हातात घेऊन ते अंतरिम सरकारकडे अल्पसंख्याकांवरील हिंसाचार थांबवण्याची मागणी करत आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more