कार्ती चिदंबरम म्हणाले, राहुलपेक्षा मोदी भारी; नोटीस आली त्यांच्या दारी!!

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : काँग्रेसचे वरिष्ठ नेते माजी केंद्रीय ग्रह आणि अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचे चिरंजीव कार्ती चिदंबरम म्हणाले, राहुल पेक्षा मोदी भारी त्यामुळे नोटीस आली त्यांच्या दारी!!, असे घडले आहे. Karti Chidambaram said Modi is heavier than Rahul

तामिळनाडूतील शिवगंगा लोकसभा मतदारसंघातले काँग्रेसचे खासदार कार्ती चिदंबरम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाची स्तुती केली. राहुल गांधींना मोदींचा मुकाबला करता येणे कठीण आहे, असे ते म्हणाले. त्यामुळे काँग्रेस पक्षाने त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे.



पंतप्रधान नरेंद्र मोदींचे लोकप्रियता अफाट आहे. त्या तुलनेत राहुल गांधी तितकेसे लोकप्रिय नाहीत. ते संघर्ष करत असले तरी पंतप्रधान मोदींची मुकाबला करता येणे राहुल गांधींना शक्य नाही, असे वक्तव्य कार्ती चिदंबरम यांनी केले. राहुल गांधी भारत जोडो न्याय यात्रा काढत असताना असे असताना त्यात अडथळा निर्माण होईल असे वक्तव्य आपण का केले??, अशी विचारणा करणारी नोटीस तामिळनाडू प्रदेशाध्यक्ष काँग्रेसचे तामिळनाडू प्रदेशाध्यक्ष रामस्वामी यांनी कार्ती चिदंबरम यांना पाठवली.

तामिळनाडूतील मनी लॉन्ड्रीग प्रकरणात कार्ती चिदंबरम वारंवार ईडी कार्यालयाचे खेटे घालत आहेत. त्यांच्यावर शेकडो कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप आहे.

Karti Chidambaram said Modi is heavier than Rahul

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात