विशेष प्रतिनिधी
मुंबई : आपले आमदार पात्र ठरले, हा सत्याचा विजय आहे असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे आमदार पात्र ठरवताना मात्र विधानसभा अध्यक्षांवर कोणाचा दबाव होता??, असा सवाल केला आहे.Who pressurised assembly speaker not to disqualify thackeray faction mlas??, asked CM eknath shinde
हा सत्याचा विजय आहे अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या निकालाचे स्वागत केले. घराणेशाही आणि अहंकाराला ही एक मोठी चपराक असून, लोकशाहीचा विजय आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. मात्र यावेळी त्यांनी ठाकरे गटाचे आमदार पात्र ठरल्याने नाराजी व्यक्त केली. उद्धव ठाकरे यांचे आमदार पात्र ठरवताना विधानसभा अध्यक्षांवर नेमका कोणता दबाव होता??, असा सवाल त्यांनी केला.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज निकाल सुनावताना एकनाथ शिंदेंची शिवसेना खरी शिवसेना असल्याचा निर्वाळा दिला. तसंच भरत गोगावले यांची नियुक्ती वैध ठरवली. विशेष म्हणजे राहुल नार्वेकर यांनी यावेळी दोन्ही गटांनी दाखल केलेल्या अपात्रतेच्या याचिका फेटाळून लावत दोन्ही गटातील सर्व आमदारांना पात्र ठरवले.
एकनाथ शिंदे म्हणाले :
हा सत्याचा विजय आहे. या निकालामुळे घराणेशाही मोडीत निघाली आहे. लोकशाहीत बहुमताला महत्त्व आहे हे आज सिद्ध झाले आहे. ही एक मोठी चपराक असून, लोकशाहीचा विजय आहे. खरी शिवसेना, खरा धनुष्यबाण यापूर्वी निवडणूक आयोगाने आम्हाला दिला होता. तो निर्णय त्यांनी कायम ठेवला.
राजकीय पक्ष एखाद्याची खासगी मालमत्ता असू शकत नाही. त्यामुळे प्रमुखांनी चुकीचा निर्णय घेतल्यास त्याविरोधात आवाज उठवता येतो असं मत मांडण्यात आलं आहे. मी या निर्णयाचं स्वागत करतो”.
मात्र विधानसभा अध्यक्षांनी भरत गोगावले यांनी दाखल केलेली याचिका फेटाळली, ते अयोग्य आहे. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण एकनाथ शिंदे आणि आमदारांच्या बाजूने दिला असताना, त्या अर्थाने आम्ही जो व्हिप दिला होता, त्या हिशोबाने 14 आमदार अपात्र ठरायला हवे होते. त्यांना कोणत्या दबावाखाली अपात्र केले नाही??, ते आम्हाला अनपेक्षित आहे. या निकालाचा पूर्ण अभ्यास करुन, कायदेतज्ज्ञांची चर्चा करुन नेमके कोणत्या कारणांमुळे त्यांना अपात्र ठरवले नाही हे समजून घेऊ. कारण आम्ही दिलेला व्हीप मिळाला नाही असे त्यांच्यातील कोणीही सांगितले नव्हते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App