भयानक : चार वर्षीय चिमुकल्याचा मृतदेह बॅगेत घेऊन जाणाऱ्या स्टार्ट अपच्या CEOला बंगळुरुमध्ये अटक

उत्तर गोव्यात पोटच्या गोळ्याचं आयुष्य संपवलं


विशेष प्रतिनिधी

बंगळुरु : एका स्टार्ट-अप कंपनीच्या सीईओने तिच्या चार वर्षांच्या मुलाची हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. प्राप्त माहितीनुसार, पोलिसांनी 39 वर्षीय महिला सीईओविरोधात गुन्हा दाखल केला आहे. महिलेने उत्तर गोव्यात मुलाची हत्या केली आणि नंतर मृतदेह बॅगेत टाकून कर्नाटकात परतली. मात्र, हत्येमागचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.Start up CEO arrested in Bangalore for carrying four year old boy’s body in a bag

मिळालेल्या माहितीनुसार, सुचना सेठ असे महिलेचे नाव आहे. सुचना सेठ या आर्टिफिशियल इंटेलिजन्स स्टार्ट-अप माइंडफुल एआय लॅबच्या सीईओ आहेत. सोमवारी त्यांना कर्नाटकातील चित्रदुर्ग येथे मुलाच्या मृतदेहासह अटक करण्यात आली. बॅगेत ठेवलेला मृतदेह कर्नाटकात नेण्यासाठी सेठ यांनी टॅक्सी भाड्याने घेतली होती. सध्या त्यांना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर खुनाचा आरोप आहे. ही महिला कर्नाटकातील चित्रदुर्ग येथे पोहोचली होती.



ही बाब तेव्हा उघडकीस आली जेव्हा महिलेने हॉटेलमधून चेकआउट केले असता सफाई कर्मचाऱ्यांना खोलीत रक्ताचे डाग दिसले. सोमवार, 8 जानेवारी रोजी सकाळी सुचना सेठ या बॅग घेऊन खोलीबाहेर गेल्या असता खोलीमध्ये रक्ताचे डाग आढळून आले. सोमवारी त्या एकटाच खोलीतून बाहेर आल्या आणि हॉटेल कर्मचाऱ्यांना त्यांनी बंगळुरूला जाण्यासाठी टॅक्सी बुक करण्यास सांगितले. कर्मचार्‍यांनी फ्लाइट घेण्याचा सल्ला दिला, पण सुचना सेठ यांनी टॅक्सी मागितली. टॅक्सी बुक करण्यासाठी वारंवार आग्रह धरला जात असल्याची माहिती कर्मचाऱ्यांनी दिली. तिचा मुलगा बेपत्ता असल्याचे कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले. त्या गेल्यानंतर हाऊसकीपिंग कर्मचार्‍यांनाही त्याच्या खोलीत रक्ताचे डाग दिसले.

हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिल्यावर पोलिसांनी संबंधित महिलेस फोनवर संपर्क साधून मुलाबाबत चौकशी केली असता, मुलगा मित्रासोबत असल्याचे तिने सांगितले आणि पत्ताही दिला. मात्र तो पत्ता चुकीचा निघाला. यानंतर पुन्हा पोलिसांनी तिच्याशी संपर्क साधल आणि संबंधित टॅक्सी चालकाशी कोकणी भाषेत बोलून टॅक्सी जवळच्या पोलिस स्टेशनला नेण्यास सांगितले. जिथे त्या महिलेस ताब्यात घेण्यात आले आणि आता तिला गोव्याला नेले जात आहे.

Start up CEO arrested in Bangalore for carrying four year old boy’s body in a bag

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात