देशातल्या सगळ्या विरोधी नेत्यांची वक्तव्ये Off track आणि सौदी अरेबियाच्या अध्यक्षांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी On the Ram track!!, हे शीर्षक सहज सुचले म्हणून दिलेले नाही, तर तसा घटनाक्रमच आज घडला आहे. Mamata, Pawar and Kharge talked against Ram, Modi took Saudi president on Ram track!!
काँग्रेसच्या नेत्यांसह बाकीच्या विरोधी पक्षांचे नेते आत्तापर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोध करता करता देशाचाही विरोध करत होते. आता त्या पुढे जाऊन ते रामालाही छुपा आणि उघड विरोध करू लागले आहेत. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासारख्या बड्या नेत्यांची वक्तव्ये आज अस्थानी स्वरूपात अशीच समोर आली.
पण त्याचवेळी पंतप्रधान मोदींनी एकही वक्तव्य न करता केवळ सौदी अरेबियाचे अध्यक्ष मोहम्मद बिन जायद यांचे अहमदाबाद विमानतळावर स्वागत केले. त्यांच्याबरोबर रोड शो करत व्हायब्रंट गुजरात समिटमध्ये पोहोचले. अध्यक्ष मोहम्मद बिन जायद यांचे स्वागत करताना मोदींनी ते आपले “बंधू” आहेत, एवढेच ट्विट केले.
हा सगळा घटनाक्रम आज देशातल्या वेगवेगळ्या ठिकाणी घडला. मल्लिकार्जुन खर्गेंनी बंगलोर मध्ये वक्तव्य केले. शरद पवारांनी मुंबईत वक्तव्य केले, तर ममता बॅनर्जींनी कोलकत्यातून वक्तव्य केले आणि मोदींनी अहमदाबाद मध्ये “कृती” केली. वरवर पाहता या चारही गोष्टींचा एकमेकांशी काहीही संबंध नाही. पण तरीही त्यामध्ये एक फार मोठे अंतःसूत्र आहे आणि ते अयोध्येतल्या राम मंदिराशी संबंधित आहे.*
शरद पवारांनी मुंबईत पत्रकार परिषदेत मुंबईतल्या शाळांमध्ये घेतलेल्या श्रीराम विषयाच्या स्पर्धेला विरोध केला. हा देश सेक्युलर आहे. त्यामुळे एकाच धर्माला प्रोत्साहन देणारे कुठलेही उपक्रम शाळांमध्ये राबवायला नकोत. मुलांवर तसे संस्कार करायला नकोत. मुंबईचे पालकमंत्री जर तसा आग्रह धरत असतील, तर ते चुकीचे आहे, असे वक्तव्य त्यांनी केले.
ममता बॅनर्जींनी कोलकत्यात देव आणि अल्लाची शपथ घेतली आणि ती शपथ घेऊन त्यांनी आपण हिंदू – मुस्लिम भेद करणार नाही अशी ग्वाही दिली. अयोध्येत त्यांना कुठले मंदिर बांधायचे ते बांधोत. त्यांना निवडणुकीसाठी काय जुमले करायचेत, ते करोत. मी त्यात पडणार नाही हे मी देव आणि अल्लाची शपथ घेऊन सांगते, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या.
#WATCH अहमदाबाद (गुजरात): पीएम नरेंद्र मोदी और यूएई के राष्ट्रपति मोहम्मद बिन जायद अल नाहयान की मौजूदगी में दोनों देशों के बीच समझौता ज्ञापन पर हस्ताक्षर हुए। pic.twitter.com/6dlBIqTqjW — ANI_HindiNews (@AHindinews) January 9, 2024
#WATCH अहमदाबाद (गुजरात): पीएम नरेंद्र मोदी और यूएई के राष्ट्रपति मोहम्मद बिन जायद अल नाहयान की मौजूदगी में दोनों देशों के बीच समझौता ज्ञापन पर हस्ताक्षर हुए। pic.twitter.com/6dlBIqTqjW
— ANI_HindiNews (@AHindinews) January 9, 2024
मालदीवच्या चीनधार्जिण्या अध्यक्षांच्या तीन मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधात वक्तव्य केल्यानंतर भारतात मालदीव विरोधात प्रचंड वातावरण तापले असताना काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मात्र बंगलोर मध्ये पंतप्रधान मोदीं विरोधातच वक्तव्य केले. फक्त वेळ केले पंतप्रधान मोदी आंतरराष्ट्रीय बाबी अनावश्यक “पर्सनली” घेतात आणि “इमोशनल फोबिया” तयार करतात. त्यांनी शेजारच्या देशांशी चांगले संबंध ठेवले पाहिजेत, असे वक्तव्य करून खर्गे यांनी मालदीवची बाजू उचलून धरली.
वास्तविक पवार, ममता आणि खर्गे हे तीन अतिवरिष्ठ नेते आहेत. वर्षानुवर्षे त्यांनी सत्तेचे राजकारण केले आहे, तरी देखील देशात सर्वत्र राम मंदिराचे उत्साहाचे वातावरण असताना त्याला छेद देणारी अस्थानी स्वरूपाची वक्तव्य करून आपल्याच पायावर मोठा राजकीय धोंडा पाडून घेतला आहे. देशात सगळीकडे राम मंदिराचा उत्साही माहोल असताना आत्ताच्या भारतीय राजकीय – सामाजिक वातावरणामध्ये या तीनही नेत्यांची ही वक्तव्य बिलकुलच कोणालाही ग्राह्य होणार नाही. कोणी ती स्वीकारण्याची शक्यताही नाही.
भले या तीनही नेत्यांचा मोदींना ठाम विरोध असेल, पण किमान राजकीय अनुभवातून कोणत्या वेळी कोणते वक्तव्य करायचे,हे देखील त्यांना समजत नसल्याचे त्यांच्या वेगवेगळ्या वक्तव्यांमधून समोर आले. वास्तविक पवार, ममता आणि खर्गे एवढे दीर्घकाळ राजकारणात आहेत की, “राजकीय टाइमिंग” कसे साधायचे हे त्यांना इतरांकडून शिकण्याची बिलकुल गरज नाही. पण तरी देखील मोदी विरोधातल्या भूमिकेमुळे त्यांना एवढे “राजकीय बौद्धिक अंधत्व” आले आहे की, त्यांचे टीकाटिप्पणी करताना आजचे “राजकीय टाइमिंग” देखील चुकले आहे!!
त्या उलट मोदींनी एकही शब्द न बोलता देशात सर्वत्र राम मंदिरासंदर्भातला उत्साह ओसंडून वाहत असताना जगातले सर्वांत महत्त्वाचे मुस्लिम राष्ट्र असलेल्या सौदी अरेबियाच्या राष्ट्राध्यक्षांंबरोबर अहमदाबाद मध्ये रोड शो केला. मोदी एकही शब्द बोलले नाहीत. फक्त सौदी राष्ट्राध्यक्षांना ते आपले “बंधू” म्हणाले. यातून मोदींनी संपूर्ण मुस्लिम जगताला स्वतःच्या सरकार विषयीचा स्वच्छ दृष्टिकोन सांगून टाकला. अयोध्येत भव्य राम मंदिर होत असले, तरी त्यात कोणताही इतर धर्मियांचा विरोध नाही. मुस्लिमांचा विरोध तर बिलकुल नाही हे मोदींनी कुठल्याही तोंडी वक्तव्यातून नव्हे, तर कृतीतून दाखवून दिले. मोदींनी साधलेले हे उत्तम “राजकीय टाइमिंग” होते.
असले टायमिंग खर्गे, ममता आणि पवारांना अजिबात साधता आले नाही,म्हणूनच वर शीर्षक दिले, विरोधकांची वक्तव्ये Off track, तर सौदी अरब अध्यक्षांसह मोदी On the Ram track!!
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App