सरकार सैंविधानिक पद्धतीनेच स्थापन, हे सुरुवातीपासूनच सांगत होतो; फडणवीसांचा ठाकरे पवारांना टोला

विशेष प्रतिनिधी

मुंबई : शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावरून शिंदे फडणवीस सरकार जाणार अशी अवय उगाचच विरोधक उठवत होते पण सरकार सैंविधानिक पद्धतीनेच कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करूनच स्थापन केले होते हे आम्ही पहिल्यापासून सांगत होतो असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे – पवारांना लगावला.Shinde fadnavis government formation constitutional, says devendra fadnavis

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला आहे. निकाल देताना उद्धव ठाकरे यांच्या गटाचे प्रतिज्ञापत्र अमान्य करत शिंदे गटातील 16 आमदारांना नार्वेकर यांनी पात्र ठरवले आहे, तसेच खरी शिवसेना देखील एकनाथ शिंदे यांचीच असल्याचे नार्वेकरांनी स्पष्ट केले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीटद्वारे या निकालावर मोठे विधान केले आहे.



उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात राज्यात सरकार स्थापन करताना संवैधानिक आणि कायदेशीर प्रक्रियेचे संपूर्णत: पालन करण्यात आले होते आणि त्यामुळेच हे सरकार मजबुत आणि भक्कम आहे, असे आम्ही प्रारंभीपासूनच सांगत होतो. त्यामुळेच सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा आपल्या आदेशात हे सरकार बरखास्त करण्याचा कुठलाही आदेश देण्याची गरज नाही, असे स्पष्ट केले होते.

याचबरोबर ‘पण, काही लोक मुद्दाम आणि वारंवार सरकारबाबत गैरसमज पसरवून राज्यातील वातावरण अस्थिर करण्याचा प्रयत्न करीत होते. आज विधानसभाध्यक्षांनी विविध नियमांचा दाखला घेत, जो आदेश आज दिला, त्यानंतर आतातरी कुणाच्या मनात सरकारच्या स्थैर्याबाबत शंका राहण्याचे कारण नाही.’ असं फडणवीस म्हणाले आहेत.

याशिवाय ‘मी पुन्हा सांगतो, हे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकार्‍यांचे मी मनापासून अभिनंदन करतो.’ असे फडणवीस यांनी म्हटले आहे.

विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी खरी शिवसेना ही एकनाथ शिंदेंचीच (Eknath Shinde) आणि शिंदे गटातील सर्व आमदार पात्र म्हणून निर्णय दिला. शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांची निवडदेखील त्यांनी वैध असल्याचा निर्णय दिला. सुनील प्रभू यांचा व्हीप आमदारांना लागू होणार नाही आणि त्यामुळे शिंदेंचे आमदार हे पात्र ठरतात, असा निर्णय राहुल नार्वेकर यांनी दिला.

अध्यक्षांनी हा निकाल दिल्यानंतर भरत गोगावले यांनी सुनील प्रभूंना हाक मारून त्यांच्यापुढे हात जोडले. सुनील प्रभू हे बाहेर जायला निघताच गोगावले यांनी त्यांच्या पुढ्यात हात जोडले. यावेळी गोगावलेंच्या चेहऱ्यावर जिंकण्याचा आनंद दिसला.

Shinde fadnavis government formation constitutional, says devendra fadnavis

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात