आज मनी लाँड्रिंग प्रकरणात चौकशी होणार.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : आता फारुख अब्दुल्ला ईडी चौकशीच्या रडारावर आले आहेत. अंमलबजावणी संचालनालयाने चौकशीसाठी बोलावलेल्यांमध्ये आणखी एका विरोधी नेत्याचे नाव जोडले गेले आहे. ईडीने नॅशनल कॉन्फरन्सचे नेते आणि खासदार फारुख अब्दुल्ला यांना चौकशीसाठी समन्स बजावले आहे. ED summons National Conference leader Farooq Abdullah in money laundering case
या प्रकरणात आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, जम्मू आणि काश्मीर क्रिकेट असोसिएशन (जेकेसीए) मधील कथित आर्थिक अनियमिततांबाबत ईडी फारुक अब्दुल्लांची चौकशी करू शकते. समन्समध्ये अब्दुल्ला यांना श्रीनगर येथील ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.
शशी थरूर, दानिश अली, फारुख अब्दुल्ला आणि डिंपल यांच्यासह ४९ खासदार आज पुन्हा निलंबित
फारुख अब्दुल्ला यांना आज अंमलबजावणी संचालनालयाने चौकशीसाठी बोलावले आहे. 86 वर्षीय फारूक अब्दुल्ला हे श्रीनगर लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत, त्यांच्याविरुद्ध जम्मू आणि काश्मीर क्रिकेट असोसिएशनच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात 2022 मध्ये ईडीने आरोपपत्र दाखल केले होते.
जम्मू-काश्मीर क्रिकेट असोसिएशनचा निधी काढून घेण्याशी संबंधित हे प्रकरण आहे, असे ईडीचे म्हणणे आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण जेकेसीएच्या बँक खात्यांमधून अस्पष्टपणे पैसे काढण्याशी जोडले जात आहे, ज्यामध्ये जेकेसीएचे अनेक अधिकारी कथितपणे सहभागी असल्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, JKCA च्या बँक खात्यांमधून विविध वैयक्तिक बँक खात्यांमध्ये हस्तांतरित करून रक्कम काढण्यात आली, जी पूर्णपणे अस्पष्ट आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App