जम्मू-काश्मीर : शोपियानमध्ये दहशतवादी हल्ला, तीन जण ठार, राज्यात अलर्ट जारी!


मोठा दहशतवादी हल्ला घडवण्याच्या तयारीत होते.

विशेष प्रतिनिधी

जम्मू-काश्मीर : शोपियानमध्ये गुरुवारी रात्री उशिरा दहशतवाद्यांनी तीन जणांची गोळ्या झाडून हत्या केली. अन्वर, हिरालाल आणि पिटोन अशी हत्या करण्यात आलेल्यांची नावे असून तिघेही राज्याबाहेरचे आहेत. गोळी लागल्यानंतर स्थानिक लोकांनी तिघांनाही रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यांचा मृत्यू झाला होता. सध्या या प्रकरणाचा तपास पोलीस आणि लष्कर करत आहेत. Jammu and Kashmir Terrorist attack in Shopian three people killed alert issued in the state

घटनास्थळ सील करून तपास सुरू –

या हल्ल्यानंतर पोलीस आणि लष्कर अलर्टवर आहे. पोलिसांनी शोपियातील गगरान परिसर सील करून तपास सुरू केला आहे. सुरक्षा दल दहशतवाद्यांचा शोध घेत आहेत. त्याचबरोबर पोलिसांनी तिघांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले आहेत.

दहशतवादी हल्ल्याचा प्रयत्न झाला –

आतापर्यंतच्या तपासात असे आढळून आले आहे की, हे आरोपी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला करण्याच्या तयारीत होते. जे खूप दिवसांपासून यासाठी प्रयत्न करत होते. राजौरी जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या एका दहशतवाद्याला लष्कराने मंगळवारी ठार केले. हा आरोपीही त्याच दहशतवाद्याचा साथीदार असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.

Jammu and Kashmir Terrorist attack in Shopian three people killed alert issued in the state

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात