विशेष प्रतिनिधी
दिल्ली: दिल्ली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बुधवारी बैठक झाली. बैठकीत शाळांचे ज्यूनिअर वर्ग पण सणानंतर चालू करणार आहेत असा निर्णय घेतला आहे. ही बैठक लेफ्टनंट गव्हर्नर अनिल बैजल यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीत उपस्थित असलेल्या सूत्रांनी सांगितले की, राजधानीतील कोविड १९ ची परिस्थिती चांगली आहे. तरीही सावधगिरी बाळगावी लागणार आहे.
Important update regarding Delhi schools reopening, Delhi schools to reopen after festive seasons
असे ठरविण्यात आले आहे की, इतर वर्गांसाठी शाळा दिवाळीनंतर परत सुरु होतील. शहरातील सर्व खाजगी तसेच सहकारी शाळांना नववी ते बारावीचे वर्ग १ सप्टेंबर रोजीच चालू करण्याची परवानगी डि.डि.एम.ए. नी दिली होती.
दसरा, दुर्गा पूजा, रामलीला इ. सण सर्व आवश्यक नियमांचे काटेकोरपणे पालन करून साजरे करण्यास परवानगी दिली आहे. मास्क घालणे, सोशल डिस्टन्सिंग इ. नियमांचे पालन केले पाहिजे. दिल्ली पोलिस व जिल्हा प्रशासनाला कोविड नियमांचे पालन होते की नाही यावर लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. सणासुदीच्या दरम्यान जिथे लोक एकत्रित येतील त्या ठिकाणी स्टॅंडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजरचे पालन होते की नाही ते पाहणे आवश्यक आहे. लोक ऊभे राहणे, प्रवेश व बाहेर पडण्यासाठी वेगळे दरवाजे याबाबत नियम पाळले पाहिजेत.
Maharashtra Schools : राज्यात शाळा सुरू करण्यासंदर्भात Task Force चा मोठा इशारा …सप्टेंबर अखेरपर्यंत शाळा नाहीच !
फेरीवाले, स्टॉल, जत्रा याना परवानगी नाही.
दरम्यान कोविड अंतर्गत दोन मृत्यू व ३४ नवीन रुग्ण आजच्या दिवशी आढळले. ७, १६, १७ तारखेस एक याप्रमाणे एकूण पाच मृत्यू झाले आहेत. २५ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला तर ३७३ रुग्ण उपचार घेत आहेत. १४,३८,७८० रुग्णापैकी १४.१३ लाख रुग्ण बरे झाले आहेत. आज १०५ रुग्ण होम आयसोलेशन मध्ये आहेत. सोमवारी ६५,१०१ टेस्ट केल्या गेल्या आहेत. ४१,३५९ RT-PCR असुन बाकी रॅपिड अॅंटिजेन आहेत. सोमवारी या रोगामुळे एकही मृत्यू झाला नसून ३२ नविन कोविड -१९ केस दाखल झाल्या आहेत. शहरात शुक्रवारी २४, शनिवारी २७ व रविवारी २९ केस दाखल झाल्या. कोविड पॉझिटिव्हिटी दर सोमवारी ०.०६ होता.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App