Atleast Ten killed in Colorado shooting in grocery store US

Colorado shooting : अमेरिकेत कोलोरॅडोच्या सुपरमार्केटमध्ये गोळीबार, पोलीस अधिकाऱ्यासह 10 जण ठार

अमेरिकेच्या कोलोरॅडो (Colorado shooting) येथे झालेल्या गोळीबारात पोलीस अधिकाऱ्यासह 10 जण ठार झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना बोल्डरमधील एका सुपरमार्केटमध्ये घडली. ताज्या माहितीनुसार संशयितास ताब्यात घेण्यात आले आहे. सध्या तो जखमी असून रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या शूटआऊटमागील हेतू काय होता, याचा पोलीस अद्याप तपास करत आहेत.


वृत्तसंस्था

कोलोरॅडो : अमेरिकेच्या कोलोरॅडो (Colorado shooting) येथे झालेल्या गोळीबारात पोलीस अधिकाऱ्यासह 10 जण ठार झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना बोल्डरमधील एका सुपरमार्केटमध्ये घडली. ताज्या माहितीनुसार संशयितास ताब्यात घेण्यात आले आहे. सध्या तो जखमी असून रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या शूटआऊटमागील हेतू काय होता, याचा पोलीस अद्याप तपास करत आहेत.

बोल्डर पोलीस विभागाचे कमांडर केरी यामागुची यांनी पत्रकारांना सांगितले की, अधिकाऱ्यांनी घटनेचा तपास सुरू केला आहे. त्यांना माहिती नाही की गोळीबारात आणखी किती लोक मरण पावले आहेत. बोल्डर काउंटीचे जिल्हा अॅटर्नी मायकल डोगार्टी म्हणाले की, मृतांची संख्या नंतर जाहीर केली जाईल.

बोल्डर पोलीस विभागाने ट्वीट केले की, ‘अनेकांना या घटनेत जीव गमवावा लागला आहे. बळी पडलेल्यांपैकी एक बोल्डरचे पोलीस अधिकारीही आहे. माध्यमांना मृतांच्या कुटुंबीयांच्या गोपनीयतेचा आदर करण्यास सांगण्यात आले आहे. त्याचा तपास सुरू आहे. जोपर्यंत कुटुंबीयांना माहिती दिली जात नाही तोपर्यंत पीडितांविषयी कोणतीही संख्या जाहीर केली जाणार नाही.’

व्हाइट हाऊसचे प्रवक्ते जेक साकी म्हणाले की, अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांना बोल्डर सुपरमार्केटच्या घटनेची माहिती देण्यात आली आहे आणि अधिकारी त्यांना प्रत्येक अपडेट देत आहेत. दरम्यान, गत आठवड्यातही अटलांटा, जॉर्जियामधील एका मसाज पार्लरमध्ये एका बंदूकधार्‍याने आठ जणांना गोळ्या घालून ठार मारले होते.

महत्त्वाच्या बातम्या

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*