Maharashtra Schools : राज्यात शाळा सुरू करण्यासंदर्भात Task Force चा मोठा इशारा …सप्टेंबर अखेरपर्यंत शाळा नाहीच !


  • Maharashtra Schools: Task Force’s big warning regarding starting schools in the state …
  • राज्यात लॉकडाऊनचा निर्णय हा ऑक्सिजनच्या निकषांवर आधारित असल्याचं टास्क फोर्सनं म्हटलं आहे.

विशेष प्रतिनिधी 

मुंबई: राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यामुळे शिक्षण विभागानं शाळा सुरु करण्याबाबत गेल्या आठवड्यात महत्त्वपूर्ण निर्णय घेतला होता. येत्या 17 ऑगस्टपासून राज्यातील शाळा सुरु करण्याबाबतची घोषणा देखील शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड  यांनी केली होती. पण अवघ्या 24 तासांतच सरकारनं आपला निर्णय मागे घेतला. कोरोनाच्या संभाव्य तिसरी लाटेच्या भीतीच्या पार्श्वभूमीवर सरकारनं शाळा सुरु करण्याच्या निर्णयाला स्थगिती दिली. आता टास्क फोर्सनं मोठा इशारा दिला आहे. सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत शाळा सुरु व्हायला नको, असं देखील टास्क फोर्सनं राज्य सरकारला सूचित केलं आहे.Maharashtra Schools: Task Force’s big warning regarding starting schools in the state …

राज्यात लॉकडाऊनचा (Lockdown in Maharashtra) निर्णय हा ऑक्सिजनच्या निकषांवर आधारित असल्याचं टास्क फोर्सनं म्हटलं आहे. टास्क फोर्सनं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) पत्रावर उत्तर देताना ही प्रतिक्रिया दिली आहे. शाळा सुरु करण्यासाठी वर्गातील मुलांचे दोन गट करुन आठवड्यातून दोन दिवस शाळा सुरु करता येईल का, असा सवाल मनसेनं केला होता.

शाळा सप्टेंबर अखेरपर्यंत सुरु करु नयेत…

राज्य सरकारनं कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा (Third Wave of Corona) धोका पाहता शाळा सप्टेंबर अखेरपर्यंत सुरु करु नयेत, अशा सूचना टास्क फोर्सनं (Task Force) केल्या. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं घातलेल्या विविध निर्बंधांबाबत मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे (Sandip Deshmukh) यांनी काही प्रश्न उपस्थित करत टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. संजय ओक (Dr.Sanjay Oak) यांना पत्र पाठवलं होतं. ज्यावर डॉ. ओक यांनी लेखी स्वरुपात उत्तर देऊन महत्त्वपूर्ण बाबी स्पष्ट केल्या आहेत.

 

Maharashtra Schools: Task Force’s big warning regarding starting schools in the state …

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण