Mood Of The Nation: उत्कृष्ट पंतप्रधान कोण ? पुढचे पंतप्रधान कोण ? नरेंद्र मोदीच आणखी कोण ? इंडिया टुडेने केला सर्व्हे…पाहा काय म्हणते भारताची जनता


  • भारताचे आजवरचे उत्कृष्ट पंतप्रधान कोण याबाबतही मोदींनाच पसंती मिळाली आहे.

विशेष प्रतिनिधि

नवी दिल्ली: इंडिया टुडेने सर्व्हे केला आहे. 2024 चे पंतप्रधान कोण? 2024 च्या लोकसभा निवडणुका आता जवळ आल्या आहेत. त्या अनुषंगाने विविध चर्चांना म्हणजे जसं की तिसरी आघाडी, विरोधकांची मोट बांधून मोदींना लढा देणं या सगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. अशात इंडिया टुडेने काय आहे देशाचा मूड हा सर्व्हे केला आहे. या सर्व्हेनुसार मोदीच भावी पंतप्रधान असणार आहेत .Mood Of The Nation: Who is the best Prime Minister? Who is the next Prime Minister? Who else is Narendra Modi? Survey conducted by India Today … See what the people of India say

 

काय म्हणतो आहे हा सर्व्हे ?

पंतप्रधान नरेंद्र मोदींना ऑगस्ट 2021 महिन्यात 24 टक्के लोकांनी पंतप्रधान म्हणून पसंती दिली आहे

जानेवारी 2021 या महिन्यात हे प्रमाण 38 टक्के होतं तर ऑगस्ट 2020 महिन्यात हे प्रमाण 66 टक्के होतं.

योगी आदित्यनाथ पंतप्रधान होतील का? हा प्रश्न विचारला गेला तेव्हा ऑगस्ट २०२१ या महिन्यात 11 टक्के लोक हो म्हणाले, जानेवारी 2020 महिन्यात 10 टक्के लोक हो म्हणाले आणि ऑगस्ट 2020 या महिन्यात 3 टक्के लोकांनी योगींच्या नावाला पसंती दर्शवली.

राहुल गांधींबाबत विचारण्यात आला तेव्हा

ऑगस्ट 2021 या महिन्यात 10 टक्के लोकांनी राहुल गांधींच्या नावाला पंतप्रधान म्हणून पसंती दर्शवली

जानेवारी 2020 या महिन्यात 7 टक्के लोकांनी राहुल गांधी पंतप्रधान होतील असं मत व्यक्त केलं तर ऑगस्ट 2020 या महिन्यात हे प्रमाण 8 टक्के होतं.

अरविंद केजरीवाल यांना ऑगस्ट 2021 महिन्यात 8 टक्के लोकांनी, जानेवारी 2021 या महिन्यात 5 टक्के लोकांनी तर ऑगस्ट 2020 या महिन्यात 3 टक्के लोकांनी पंतप्रधान म्हणून पसंती दर्शवली.

हाच प्रश्न जेव्हा ममता बॅनर्जी पंतप्रधान होतील का असा विचारला गेला तेव्हा 8 टक्के लोकांनी ऑगस्ट 2021 या महिन्यात तर 4 टक्के लोकांनी जानेवारी 2021 या महिन्यात 2 टक्के लोकांनी ऑगस्ट 2020 या महिन्यात ममतांच्या नावाला पसंती दर्शवली.

अमित शाह पंतप्रधान होतील का असं विचारण्यात आलं तेव्हा ऑगस्ट 2021 या महिन्यात 7 टक्के लोकांनी त्यांच्या नावाला पसंती दर्शवली. जानेवारी 2021 या महिन्यात 8 टक्के लोकांनी पसंती दर्शवली तर मागच्या वर्षीच्या ऑगस्ट महिन्यात केवळ 4 टक्के लोकांनी अमित शाह यांच्या नावाला पसंती दर्शवली.

सोनिया गांधी पुढच्या पंतप्रधान होतील का? हा प्रश्न विचारला गेला तेव्हा या महिन्यात 4 टक्के लोक हो म्हणाले, जानेवारी महिन्यातही चार टक्के लोकांनीच हो म्हटलं होतं. तर मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात 5 टक्के लोक हो म्हणाले होते. प्रियंका गांधीबाबत हेच प्रमाण ऑगस्ट महिन्यात 4 टक्के, जानेवारी महिन्यात 3 टक्के आणि मागील वर्षी याच महिन्यात 2 टक्के इतकं अल्प होतं.

वर्षभर हा सर्व्हे घेण्यात आला. त्यानंतर पंतप्रधान मोदींच भावी पंतप्रधान यात शंका नाही .

Mood Of The Nation: Who is the best Prime Minister? Who is the next Prime Minister? Who else is Narendra Modi? Survey conducted by India Today … See what the people of India say

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात