Sachin Vaze Case: NIA RAID On CIU Office, Found Suspicious Diary Which may reveal Secret Of 100 crore

Sachin Vaze Case : सचिन वाझेंच्या डायरीतून उलगडणार 100 कोटींचे रहस्य, प्रत्येक व्यवहाराचा होईल भंडाफोड!

देशातील धनकुबेर मुकेश अंबानी यांच्या आलिशान अँटिलिया या घराजवळ स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ आढळल्याप्रकरणी NIAने मुंबई पोलीस एपीआय सचिन वाझे (Sachin Vaze Case) यांना अटक केली. त्यांच्या अटकेनंतर एनआयएच्या पथकाने वाझे यांच्या कार्यालयाची झडती घेतली, त्यानंतर तेथून तेथे अनेक वस्तू सापडल्या. एनआयएचा दावा आहे की, त्यातून एक डायरी सापडली आहे ज्यामध्ये अनेक रहस्ये लपलेली असू शकतात.


विशेष प्रतिनिधी

मुंबई : देशातील धनकुबेर मुकेश अंबानी यांच्या आलिशान अँटिलिया या घराजवळ स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ आढळल्याप्रकरणी NIAने मुंबई पोलीस एपीआय सचिन वाझे (Sachin Vaze Case) यांना अटक केली. त्यांच्या अटकेनंतर एनआयएच्या पथकाने वाझे यांच्या कार्यालयाची झडती घेतली, त्यानंतर तेथून तेथे अनेक वस्तू सापडल्या. एनआयएचा दावा आहे की, त्यातून एक डायरी सापडली आहे ज्यामध्ये अनेक रहस्ये लपलेली असू शकतात.

डायरीमध्ये कोडवर्ड

एनआयएच्या सूत्रांच्या हवाल्याने ‘एबीपी न्यूज’ने वृत्त दिले आहे की, त्यांना वाझे यांच्या कार्यालयाकडून एक डायरी मिळाली आहे, ज्यामध्ये पैशांच्या व्यवहाराबद्दलची नोंद दिसून येत आहे आणि कोडवर्डमध्ये ही नोंद करण्यात आलेली आहे. बार-रेस्टॉरंट्स आणि इतर आस्थापनांसाठी गोळा केलेल्या पैशांच्या व्यवहाराचे हे पुस्तक असू शकते, असे तपास यंत्रणांचे मत आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या पत्रात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एपीआय सचिन वाझे आणि एसीपी संजय पाटील यांना पैसे गोळा करण्यास सांगितले होते, असा आरोप केला आहे.

वाझेच्या ऑफिसवर एनआयएचा छापा

वाझे यांच्या अटकेनंतर एनआयएच्या अधिकाऱ्यांनी 16 मार्च रोजी क्राइम इंटेलिजन्स युनिटच्या कार्यालयावर छापा टाकला. तेथून लॅपटॉप, मोबाइल, इतर इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स व काही कागदपत्रे मिळाली. याच छाप्यात एनआयएला एक डायरीही मिळाली, ज्यात पैशांच्या व्यवहाराच्या अनेक नोंदी आहेत.

एनआयएच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘एबीपी न्यूज’ला दिलेल्या माहितीनुसार, त्यांना डायरी सापडली आहे, परंतु त्यात काय आहे याची चौकशी सुरू आहे. ही तपासणी अगदी प्राथमिक टप्प्यावर आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आता एनआयए लवकरच या प्रकरणात ईडीला पत्र लिहू शकते आणि या प्रकरणात मनी लॉन्ड्रिंगच्या अँगलची चौकशी करण्यास सांगू शकते.

 

महत्त्वाच्या बातम्या

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*