माणदेशी संशोधकाने शोधला एक लघुग्रह ; विनायक दोलताडे यांच्या टीमची कामगिरी


वृत्तसंस्था

सातारा :अमेरिकन अवकाश संशोधन संस्थाने ( नासा) सुरु केलेल्या आंतरराष्ट्रीय लघुग्रह शोध मोहिमेमध्ये माळवाडी (ता.माण) येथील अवकाश संशोधक विनायक दोलताडे यांच्या टीमने अवकाशातील एका लघुग्रहाचा शोध लावण्यात यश मिळविले आहे.Mandeshi researcher Discovered an asteroid

नासा,पॅन स्टार्स, कॅटालीना स्काय सर्वे व हर्डीन सिमन्स युनिव्हर्सिटी टेक्सास यांच्याकडून १ ते २७ सप्टेंबर दरम्यान आंतरराष्ट्रीय लघुग्रह शोध मोहिम राबविली होती. त्यामध्ये खगोल भूगोल वेद आणि विज्ञान या टीमकडून नवीन लघुग्रहाचा शोध नोंदवण्यात आला.
विनायक दोलताडे यांच्यासह आनंद कांबळे,संकेत दळवी, वैभव सावंत,मनीष जाधव, गौरव डाहूले यांचा टीममध्ये समावेश आहे.
या ग्रहाला (P11K6CL) सध्या KBV0001 असे नाव देण्यात आले. त्याची नोंद नासाकडे केली आहे. विनायक हा एका मेंढपाळाचा मुलगा असून त्याचे प्राथमिक शिक्षण रांजणी (ता.माण) जि. सातारा येथे तर माध्यमिक शिक्षण सिद्धनाथ हायस्कूल व ज्युनिअर काॅलेज म्हसवडची भागशाळा माळवाडी येथे झाले आहे. यातील विनायक,गौरव आणि वैभव यांचे उच्च-शिक्षण पुणे विद्यापीठाच्या भूगोल विभागात झाले आहे तसेच मनीष,आनंद आणि संकेत हे मॉडर्न कॉलेज शिवाजीनगर पुणे येथून भूगोल विषयात पदवीधर झाले आहेत.
एका सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या विनायकने मिळवलेल्या या यशाबद्दल त्याचे व त्याच्या टीमचे विविध क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.

माणदेशी संशोधकाने शोधला एक लघुग्रह

 नासाच्या आंतरराष्ट्रीय लघुग्रह शोध मोहिमेत भाग

 लघुग्रहाचे नामकरण KBV0001 असे केले आहे

विनायक हा एका मेंढपाळाचा मुलगा आहे

विनायकच्या सहकाऱ्यांचीही मोलाची मदत

Mandeshi researcher Discovered an asteroid

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात