मध्य प्रदेश : ‘मी शप्पथ घेतो, काँग्रेसला सहा जागांवर पराभूत करेन’, माजी आमदाराची काँग्रेसला उघडपणे धमकी!


एकीकडे काँग्रेस सत्तेत येण्याचा दावा करत आहे, तर दुसरीकडे तिकीट न मिळाल्याने नेते बंडखोरी करत आहेत.

विशेष प्रतिनिधी

भोपाळ  : मध्य प्रदेशात विरोधी पक्षाची भूमिका बजावणारी काँग्रेस बंडखोरांमुळे हैराण झाली आहे. एकीकडे काँग्रेस सत्तेत येण्याचा दावा करत आहे, तर दुसरीकडे तिकीट न मिळाल्याने नेते बंडखोरी करत आहेत. बंडखोरांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. इंदूर विधानसभा-4 आणि बेरासियानंतर आता माजी आमदार अजब सिंह कुशवाह यांनी काँग्रेसला खुले आव्हान दिले आहे. I take an oat, I will defeat the Congress in six seats’, former MLA Ajab Singh Kushawah openly threatens the Congress

तिकीट न मिळाल्याने नाराज झालेले काँग्रेसचे माजी आमदार अजब सिंह कुशवाह यांनी काँग्रेस सोडून बसपमध्ये प्रवेश केला आहे. अजब सिंह कुशवाह हे सुमावलीतून तिकीट मागत होते, पण पक्षाने त्यांच्यावर विश्वास व्यक्त केला नाही. गोविंद सिंग यांनी त्यांचे तिकीट रद्द केल्याचा आरोप अजब सिंह यांनी केला.

तर, ”तिकीट कापल्यामुळे कुशवाह समाजात प्रचंड नाराजी आहे. मी वचन देतो की, मुरैनाच्या सहा जागांवर काँग्रेसचा पराभव करेन.” असं अजब सिंह यांनी बोलून दाखवले आहे. अजब सिंह कुशवाह यांनी माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्यावरही तिकीट कापल्याचा आरोप केला आहे.

मात्र दिग्विजय सिंह म्हणाले की, मी आणि कमलनाथ अजब सिंह कुशवाह यांना तिकीट देण्याच्या बाजूने होतो, मात्र त्यांच्याविरोधातील केसमुळे तिकीट दिले गेले नाही. या प्रकरणाबाबत अजब सिंह कुशवाह म्हणाले की, माझ्यावरील खटले बंद करण्यात आले आहेत आणि २०२० च्या पोटनिवडणुकीतही माझ्यावर असेच खटले होते, मग मला तिकीट का देण्यात आले?

I take an oat I will defeat the Congress in six seats former MLA Ajab Singh Kushawah openly threatens the Congress

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात