विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : आज संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह जम्मू आणि काश्मीर पुनर्रचना (दुरुस्ती) विधेयक 2023 आणि जम्मू आणि काश्मीर आरक्षण (दुरुस्ती) विधेयक 2023 लोकसभेत सादर करतील. ज्यावर सभागृहात चर्चा होईल.Home Minister Amit Shah will introduce the Jammu and Kashmir Reorganization Amendment Bill 2023 in the Lok Sabha today
याशिवाय, टीएमसी खासदार महुआ मोईत्रा यांच्या विरोधात कथित ‘कॅश फॉर क्वेरी’ प्रकरणावरील आचार समितीचा अहवाल देखील संसदेत सादर केला जाईल. या अहवालावर आज संसदेत प्रचंड गदारोळ होण्याची शक्यता आहे.
4 डिसेंबरपासून सुरू झालेले संसदेचे हे अधिवेशन 22 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. या कालावधीत 15 बैठका होणार असून त्यात सुमारे 21 विधेयके मांडली जाणार आहेत.
‘सरकार बनताच 4 टक्के मुस्लीम आरक्षण हटवले जाईल’, तेलंगणात गृहमंत्री अमित शाह यांची घोषणा
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पाचपैकी तीन राज्यांमध्ये भाजपच्या दणदणीत विजयामुळे भाजप नेते खूप उत्साही दिसले. यावेळी मोदी म्हणाले की राजकीय गरमी खूप वाढली आहे. लोकांच्या कल्याणाचा आणि देशाच्या उज्ज्वल भविष्याचा विचार करणार्यांसाठी हे निकाल खूपच उत्साहवर्धक आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App