विशेष प्रतिनिधी
कोलकाता : येथील व्हिक्टोरिया हाऊससमोर ‘कोलकाता चलो रॅली’ काढण्यात येणार आहे. यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज (२९ नोव्हेंबर) दुपारी विमानतळावर पोहोचतील आणि थेट हेलिकॉप्टरने रॅलीच्या ठिकाणी पोहोचणार आहेत. या रॅलीत एक लाखाहून अधिक लोकांची उपस्थिती राहणार असल्याचा दावा भाजपने केला आहे.Mamata did not give permission for bjp rally then High Court intervened and now Amit Shah will in Kolkata
कोलकातामध्ये आज भव्य रॅली होणार आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुकांत मजुमदार यांनी पत्रकारांशी बोलताना उद्दिष्ट स्पष्ट असल्याचे सांगितले होते. बंगालमध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी ज्या मुद्द्यांशी जनतेचा थेट संबंध आहे, त्यावर शाह बोलतील.
सुकांत म्हणाले होते, अमित शाह रॅलीला संबोधित करतील. पुढच्या वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी ते पश्चिम बंगालमध्ये वातावरण निर्माण करतील अशी आशा आहे. एप्रिलमध्ये एका सभेत त्यांनी आमच्यासाठी राज्यभरातून ३५ हून अधिक जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले ते. २०१९ मध्ये भाजपने राज्यातील ४२ लोकसभा जागांपैकी १८ जागा जिंकल्या होत्या.
दरम्यान, या रॅलीला ममता बॅनर्जी सरकारने परवानगी नाकारली होती. त्यानंतर राज्य भाजपने कोलकाता उच्च न्यायालयात धाव घेतली होती. एकल खंडपीठाने रॅलीला परवानगी दिली; राज्य सरकारने मोठ्या खंडपीठाकडे धाव घेतली. पण निर्णय तसाच राहिला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App