ग्रीसच्या राष्ट्राध्यक्ष कॅटरिना एन. साकेलारोपौलो यांनी मोदींना हा दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान केला.
विशेष प्रतिनिधी
अथेन्स : ग्रीसने पंतप्रधान मोदींना त्यांचा दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान केला आहे. अथेन्समध्ये शुक्रवारी (25 ऑगस्ट) ग्रीसच्या राष्ट्राध्यक्ष कॅटरिना एन. साकेलारोपौलो यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ ऑनर प्रदान केला. Greece honors PM Modi by awarding Grand Cross of the Order of Honour
पंतप्रधान मोदींनी (X) ट्विट करून या सन्मानाबद्दल ग्रीसचे आभार मानले. त्यांनी लिहिले की, “मला ड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ ऑनर प्रदान करून सन्मानित केल्याबद्दल, मी राष्ट्रपती कॅटेरिना एन साकेलारोपौलो, ग्रीसचे सरकार आणि नागरिकांचे आभार मानतो. यावरून ग्रीसच्या लोकांचा भारताप्रती असलेला आदर दिसून येतो.”
पंतप्रधान मोदी म्हणाले की, 40 वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर भारतीय पंतप्रधान ग्रीसमध्ये आले आहेत. तरीही, ना आमच्या नात्याची खोली कमी झाली ना नात्यातील उबदारपणा कमी झाला. ग्रीस आणि भारत हे जगातील दोन सर्वात जुन्या सभ्यता, दोन सर्वात जुने लोकशाही विचारधारा आणि दोन सर्वात जुने व्यापार आणि सांस्कृतिक संबंध यांच्यातील एक नैसर्गिक बंध आहेत. आमच्या नात्याचा पाया प्राचीन आणि मजबूत आहे.
#WATCH | PM Narendra Modi conferred with the Grand Cross of the Order of Honour by Greek President Katerina N. Sakellaropoulou in Athens pic.twitter.com/p3Opq0BMyZ — ANI (@ANI) August 25, 2023
#WATCH | PM Narendra Modi conferred with the Grand Cross of the Order of Honour by Greek President Katerina N. Sakellaropoulou in Athens pic.twitter.com/p3Opq0BMyZ
— ANI (@ANI) August 25, 2023
परराष्ट्र मंत्रालयाने याबाबत सांगितले की, ऑर्डर ऑफ ऑनरची स्थापना 1975 मध्ये झाली होती. ग्रीस राष्ट्रपती, पंतप्रधान आणि मान्यवरांना ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ ऑनर प्रदान करतात ज्यांनी त्यांच्या विशिष्ट स्थानामुळे ग्रीसचा दर्जा उंचावण्यास हातभार लावला आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App