Smart India Hackathon : शिक्षण मंत्रालयाने सुरू केली ‘स्मार्ट इंडिया हॅकाथॉन’ची सहावी आवृ्ती!


 समस्या सोडवण्यावर दिला जाणार भर; संशोधन करण्याची एक महत्त्वाची संधी

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : शिक्षण मंत्रालय आणि ऑल इंडिया काॅन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन (AICTE) च्या इनोव्हेशन सेलने स्मार्ट इंडिया हॅकाथॉन (SIH) ची सहावी आवृत्ती सुरू केली आहे. याअंतर्गत सिनियर एसआयएचमध्ये सहभागी होण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत आणि कनिष्ठ एसआयएचसाठी ३० ऑक्टोबरपर्यंत नाविन्यपूर्ण कल्पना सादर करता येतील.  मंत्रालयाच्या निवेदनानुसार, AICTE च्या इनोव्हेशन सेलने बुधवारी स्मार्ट इंडिया हॅकाथॉन 2023 लाँच करण्याची घोषणा केली, जी त्याची सहावी आवृत्ती.  Ministry of Education launched Smart India Hackathon Emphasis will be on problem solving

यावेळी उच्च शिक्षण सचिव के. संजय मूर्ती म्हणाले की, भारताच्या या वर्षी G20 गटाच्या अध्यक्षपदाच्या काळात आम्ही UNESCO इंडिया-आफ्रिका हॅकाथॉनचे आयोजन केले होते ज्यामध्ये 22 आफ्रिकन देश सहभागी झाले होते आणि भारतीय विद्यार्थ्यांना त्यांच्यासोबत आफ्रिकन देशांशी संबंधित समस्यांवर काम करण्याची संधी मिळाली.

भविष्य घडवण्यासाठी नावीन्यपूर्णतेची भूमिका अधोरेखित करताना, AICTE चे अध्यक्ष, टीजी सीताराम म्हणाले की, भविष्याची उभारणी नाविन्यपूर्णतेवर आधारित आहे आणि 7500 नाविन्यपूर्ण संस्थांच्या नेटवर्कसह स्मार्ट इंडिया हॅकाथॉन सहभागींना समस्यांवर काम करण्याची संधी देईल. यातून त्यांना संशोधन करण्याची एक महत्त्वाची संधी आणि समस्यांचे अपारंपारिक उपाय शोधण्यासाठी प्रेरणा मिळते.

Ministry of Education launched Smart India Hackathon Emphasis will be on problem solving

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात विठ्ठल रखुमाईला शोभुनी दिसतो तिरंगा!