सर्वजण श्रीलंकेचे रहिवासी ; ATS तपासात गुंतली
विशेष प्रतिनिधी
अहमदाबाद : गुजरात पोलिसांनी इस्लामिक स्टेटच्या चार दहशतवाद्यांना अहमदाबाद विमानतळावरून अटक केली आहे. . पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे सर्वजण श्रीलंकेचे रहिवासी आहेत. हे सर्वजण इस्लामिक स्टेटशी संबंधित आहेत. गुजरात पोलिसांच्या एटीएसने दहशतवाद्यांना अटक केल्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.Four ISIS terrorists arrested from Gujarats Ahmedabad airport
एटीएस या सर्व दहशतवाद्यांना गुप्त ठिकाणी नेऊन त्यांची चौकशी करण्यात व्यस्त आहे. अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावर दहशतवादी कोणत्या उद्देशाने पोहोचले? याचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
गेल्या वर्षी पोलिसांनी पोरबंदरमधून ISIS साठी काम करणाऱ्या काही संशयितांना अटक केली होती. त्यानंतर आयएसच्या इंडिया मॉड्यूलचा भंडाफोड करण्यात आला.
गुजरातचे डीजीपी विकास सहाय म्हणाले, ‘मोहम्मद नुसरत, मोहम्मद नुफ्रान, मोहम्मद फारिस आणि मोहम्मद रझदीन हे चार जण श्रीलंकेचे नागरिक आणि प्रतिबंधित दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटचे सक्रिय सदस्य असल्याची माहिती मिळाली. सर्वजण ISIS च्या विचारसरणीने कट्टरतावादी आहेत. ते दहशतवादी हल्ले करण्यासाठी भारतात येणार होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App