माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह, नरसिंह राव आणि शास्त्रज्ञ स्वामिनाथन यांना ‘भारतरत्न’ जाहीर


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट्द्वारे दिली माहिती Former Prime Minister Chaudhary Charan Singh Narasimha Rao and scientist Swaminathan announced ‘Bharat Ratna’

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : मोदी सरकारने माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह, माजी पंतप्रधान नरसिंह राव आणि शास्त्रज्ञ स्वामीनाथन यांना भारतरत्न देण्याची घोषणा केली आहे. गेल्या काही महिन्यांत मोदी सरकारने पाच जणांना भारतरत्न देऊन सन्मानित करण्याची घोषणा केली आहे.

याआधी लालकृष्ण अडवाणी आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न देण्याची घोषणाही करण्यात आली होती. आता केंद्र सरकारने दोन माजी पंतप्रधान आणि एका शास्त्रज्ञांना देशाच्या सर्वोच्च सन्मानाने सन्मानित करण्याची घोषणा केली आहे.

पंतप्रधान मोदींनी माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह, माजी पंतप्रधान नरसिंह राव आणि वैज्ञानिक स्वामीनाथ यांना भारतरत्न देण्याची घोषणा केली. त्यांनी त्यांच्या अधिकृत X खात्यावरून याबाबत माहिती दिली. त्यांनी शुक्रवारी ट्विटरवर लिहिले की, माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह, माजी पंतप्रधान नरसिंह राव आणि कृषी क्षेत्रात अभूतपूर्व योगदान देणारे एमएस स्वामीनाथन यांना भारतरत्नने सन्मानित करण्यात येणार आहे.

Former Prime Minister Chaudhary Charan Singh Narasimha Rao and scientist Swaminathan announced ‘Bharat Ratna’

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात